Odisha Train Accident | रेल्वेच्या भयानक अपघातात आईच्या प्रसंगावधनानं वाचवला कुटुंबाचा जीव

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Odisha Train Accident | टीम महाराष्ट्र देशा: ओडिसा राज्यातील महानगर बाजार रेल्वे स्थानकावर भीषण रेल्वे अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत 275 लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

A train accident occurred when three trains collided

बालासोरमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये (Odisha Train Accident) प्रसंगावधान राखून एका महिलेने आपल्या कुटुंबाचा जीव वाचवला आहे. या अपघातामध्ये तीन ट्रेनची धडक झाल्यानंतर डब्यांचा चुराडा झाला होता. रेल्वेची टक्कर झाल्यानंतर भयंकर आवाज झाला. त्याचवेळी 45 वर्षे सीता दास यांनी आपल्या मुलींचा जीव वाचवला.

45 वर्षीय सीता दास यांनी सांगितलं, रेल्वेचा भयानक आवाज झाल्यानंतर मला असं वाटलं की माझा जीव नाही वाचणार, तरी मी माझ्या मुलींचा जीव वाचवू शकते. जोरात धमाका होताच मी आपल्या दोन्ही मुलींना रेल्वेच्या बाहेर फेकलं. या भयंकर अपघातामध्ये (Odisha Train Accident) सीता आणि त्यांच्या पतीला किरकोळ जखम झाली आहे. तर त्यांच्या दोन्ही मुलींचा जीव वाचला आहे.

दरम्यान, ओडिसा येथील बहानगा बाजार रेल्वे स्थानकावर भीषण अपघात (Odisha Train Accident) झाला आहे. यामध्ये कोरोमंडळ एक्सप्रेस आणि मालगाडी यांची टक्कर झाली होती. त्यानंतर या गाड्यांना हावडा एक्सप्रेसने धडक दिली. या अपघातानंतर देशात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या