Shefali Vaidya | “थू बाबा थू…”; थुंकणाऱ्या संजय राऊतांना शेफाली वैद्यनं कवितेच्या माध्यमातून डिवचलं

Shefali Vaidya | मुंबई: काही दिवसांपूर्वी माध्यमांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी संजय राऊत थुंकले आणि मग त्यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांच्या या कृत्यावर शेफाली वैद्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘थू बाबा थू’ अशी कविता लिहीतं शेफाली वैद्य यांनी संजय राऊत यांना डिवचलं आहे.

संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेला शेफाली वैद्य (Shefali Vaidya) यांनी कवितेच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ‘एका राजकीय पक्षाचा थुंक टँक असलेल्या विश्वप्रवक्त्याला’, असं म्हणतं शेफाली वैद्य यांनी कविता केली आहे.

शेफाली वैद्य यांची कविता (Poetry by Shefali Vaidya)

एका राजकीय पक्षाचा थूंक टँक असलेल्या विश्वप्रवक्त्याला…

थू बाबा थू, सतरा भानगडी धू
पुन्हा थुंकलास काय माझ्या नॉटी रे तू

आत पोकळ, बाहेर पोकळ, दंड पडवळू
जबरदस्ती मुख्यमंत्री झाला तोही पोरखेळू

थू बाबा थू, सतरा भानगडी धू
पुन्हा थुंकलास काय माझ्या नॉटी रे तू

काहीबाही बरळू लागे, जीभ सैल सोडून नॉटी
लाज सोडून थुंके पचकन, रोज कॅमेऱ्यासाठी

थू बाबा थू, सतरा भानगडी धू
पुन्हा थुंकलास काय माझ्या नॉटी रे तू

नवा नवा खासदार तवा भाजे अस्मितेचे मांडे
आता पुरती लाज घालवून कोंबड्यावानी भांडे

थू बाबा थू, सतरा भानगडी धू
पुन्हा थुंकलास काय माझ्या नॉटी रे तू

शिव्या देई, शाप देई, बोटे मोडी लोका
देवाजीचा संग नाही, फिस्कारतो बोका

थू बाबा थू, सतरा भानगडी धू
पुन्हा थुंकलास काय माझ्या नॉटी रे तू

पत्रकार मिंधा, करतो धंदा, लाचारी नाही बरी
नॉटीचा नाद सोडून द्यावा असेल लाज जरातरी

थू बाबा थू, सतरा भानगडी धू
पुन्हा थुंकलास काय माझ्या नॉटी रे तू

शेफाली वैद्य

दरम्यान, संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या कृत्यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रतिक्रिया दिली होती. संजय राऊत यांनी बोलताना संयम राखला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या