Share

Cabinet Expansion | तरुणांना संधी तर वाचाळवीरांना डच्चू! राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांच्या शिंदे-फडणवीसांना सूचना

Cabinet Expansion | दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यांच्या या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. काल दिल्ली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी … Read more

Published On: 

Cabinet Expansion | दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यांच्या या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

काल दिल्ली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जवळपास दोन तास अमित शाह यांच्याबरोबर चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Expansion) ही चर्चा झाली असल्याची अपडेट समोर आली आहे.

Give opportunity to new and young faces in cabinet expansion

नवीन आणि तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) संधी द्या, अशा सूचना शाह यांनी शिंदे-फडणवीस यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर वाचाळवीरांना मंत्रिमंडळ विस्तारापासून दूर ठेवण्याचे आदेश अमित शाह यांनी दिल्याचे माहिती मिळाली आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) केला जाणार आहे. यामध्ये शिंदे गटातील दोन खासदारांना राज्य मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर महिला आमदारांना देखील यामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install