Ashadhi Wari | आषाढी वारीत ड्रोन कॅमेरा वापरण्यास बंदी! जाणून घ्या सविस्तर

Ashadhi Wari | सोलापूर: वारकऱ्यांचा सर्वात मोठा उत्सव आषाढी वारी लवकरच सुरू होणार आहे. पांडुरंगाच्या या वारीमध्ये लाखो भाविक विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन पंढरपूरच्या दिशेने चालत जातात. हा वैष्णवांचा मेळावा अनेक लोक कॅमेरात साठवून ठेवतात. मात्र, यावर्षी आषाढी वारी मार्गावर ड्रोन कॅमेरा वापरण्यावर सक्ती करण्यात आली आहे.

Drone cameras have been banned for the safety of devotees

आषाढी वारीदरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ड्रोन कॅमेऱ्यावर बंदी घालण्यात आली आहे. ड्रोन कॅमेराद्वारे फोटो आणि माहितीचा गैरवापर केला जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सर्व वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

20 जुन ते 4 जुलै या कालावधीमध्ये मानाच्या पालख्या पंढरीच्या दिशेने जाणार आहे. या वारीदरम्यान लाखो भाविक एकत्र येतात. त्यामुळे पालखी मार्गावर माध्यम खाजगी संस्था आणि इतर अन्य संस्थेकडून पालखी सोहळ्याचे चित्रीकरण केले जाते. पालखी सोहळ्यामध्ये केले गेलेल्या चित्रीकरणाचा गैरफायदा होऊ नये, म्हणून ड्रोन कॅमेऱ्यावर बंदी घालण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button