UPI Payment | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक व्यक्ती यूपीआय पेमेंटला प्राधान्य देतो. यूपीआय पेमेंटमुळे आर्थिक व्यवहार खूप सोपे झाले आहे. मात्र, यूपीआय पेमेंट करत असताना खबरदारी घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण अनेकदा ऑनलाइन पेमेंट करत असताना फसवणूक होऊ शकते.
यूपीआय पेमेंटमुळे (UPI Payment) व्यवहार करणे सोपे झाले असले, तरी सायबर क्राईमचा धोका वाढला आहे. पेमेंटमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे यूपीआय पेमेंट फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकतात.
Follow these tips to stay safe from UPI payment fraud
- तुम्हाला जर कुणी चुकून ऑनलाईन पैसे पाठवले असतील, तर त्या व्यक्तीची ओळख आणि सर्व तपशील तपासूनच त्यावर कारवाई करावी.
- अज्ञात किंवा संशयित व्यक्तीसोबत आपला यूपीआय पिन शेअर करू नये.
- ऑनलाइन किंवा यूपीआय पेमेंट करण्याआधी व्यक्तीची व्यवस्थित ओळख तपासावी आणि मगच पेमेंट करावे.
Keep these things in mind while using UPI payments
- यूपीआय पेमेंट (UPI Payment) करत असताना योग्य यूपीआय आयडी आणि ज्यांना पैसे द्यायचे आहे, त्यांचे नाव आणि पत्ता तपासून घ्या. योग्य ती माहिती प्रविष्ट करूनच पेमेंट करा.
- अनेकदा बँक सर्वर डाऊन असल्यामुळे पेमेंट होत नाही. त्यामुळे इतर कोणतेही पर्याय अवलंबवण्याच्या आधी बँकेची स्थिती जाणून घ्या.
- यूपीआय पेमेंट करण्याआधी तुमचे इंटरनेट कनेक्शन योग्यरीत्या काम करत आहे की नाही, हे तपासून घ्या. इंटरनेट कनेक्शन स्थिर नसल्यास यूपीआय पेमेंट करणे टाळा.
If UPI payment fails…
यूपीआय पेमेंट (UPI Payment) केल्यानंतर ते अयशस्वी झाल्यावर तुम्ही यूपीआय कस्टमर केअरसोबत संपर्क साधू शकतात. त्यांना तुमच्या समस्या आणि तपशीलांबद्दल माहिती दिल्यानंतर ते तुम्हाला मदत करतील.
महत्वाच्या बातम्या
- Viral News | 40 वर्षीय व्यक्तीचं लग्नासाठी थेट तहसीलदारांना पत्र! म्हणाला, “लग्नासाठी गोरी आणि सडपातळ बायको…”
- Odisha Train Accident | अखेर बाप, बाप असतो! रेल्वे अपघातात शवगृहातून आपल्या मुलाला शोधलं जिवंत
- Ashadhi Wari | आषाढी वारीत ड्रोन कॅमेरा वापरण्यास बंदी! जाणून घ्या सविस्तर
- Dress Code In Temple | जळगाव जिल्ह्यातील ‘या’ मंदिरात ड्रेस कोड लागू
- WTC Final | WTC फायनल पूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी! सामन्याआधी आले ‘हे’ फोटो समोर