Weather Update | अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ सक्रिय, मान्सूनवर काय होणार परिणाम? जाणून घ्या

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात 04 रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, मान्सूनसाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागणार असून राज्यात 09 जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तत्पूर्वी मध्य पूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. अरबी समुद्रामध्ये ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ (Cyclone Biperjoy) तयार होत आहे.

Cyclone Biperjoy has become active in the Arabian Sea

अरबी समुद्रामध्ये ‘बिपरजॉय’ नावाचे चक्रीवादळ सक्रिय झाले आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्याने वादळाला ऊर्जा मिळत असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. पुढील 24 तासात या चक्रीवादळाची तीव्रता आणखीन वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आला आहे.

May have to wait more for monsoon

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनच्या केरळमधील आगमनावर होऊ शकतो. ‘बिपरजॉय’मुळे मान्सूनसाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागू शकते. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर केरळमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली (Weather Update) आहे.

दरम्यान, अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे किनारपट्टी भागामध्ये जास्त पाऊस (Weather Update) पडणार नसल्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. परंतु, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना सावध राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button