Nilesh Rane | कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार; निलेश राणेंचा पवारांवर घणाघात

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सध्या औरंगजेबचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये अनेक ठिकाणी दंगली घडून आल्या आहेत. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यांच्या या टिकेला निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nilesh Rane criticized Sharad Pawar

निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ट्विट करत निलेश राणे म्हणाले, “निवडणुका जवळ आल्या की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होऊ लागतात. कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार.”

Sharad Pawar criticizes the state government

माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “सध्या देशामध्ये धार्मिक वाद वाढत चालले आहे. व्यक्तिगत कारणांमुळे समाजावर हल्लाबोल करणे अत्यंत चुकीचे आहे. मुस्लिम समाजाकडून चुका होतात तशा हिंदूकडूनही होऊ शकतात. देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्माबद्दल काळजी वाटावी, अशी सध्या त्यांची परिस्थिती आहे.”

दरम्यान, औरंगजेबाच्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेलं आहे. अशात निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button