Nitesh Rane | सिंधुदुर्ग: काल संपूर्ण राज्यात उत्साहात आणि जल्लोषात शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Sohala) साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापुरात मोर्चे काढण्यात आले आहे. कोल्हापूरमध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आंदोलन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे.
Is Uddhav Thackeray the mastermind behind the riots?
कोल्हापूरमध्ये झालेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देत असताना नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. कोल्हापूरमध्ये झालेल्या दंगलीमागं खरंच उद्धव ठाकरे मास्टरमाईंड आहे का? याबाबत चौकशी करावी अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही मोर्चे निघत आहे, ते हिंदुत्वाला जागृत करण्यासाठी निघत आहेत. हे मोर्चे राज्य सरकारवर टीका करण्यासाठी नाही.
पुढे बोलताना ते (Nitesh Rane) म्हणाले, “लव्ह जिहाद सारख्या प्रकरणांमुळे हिंदू माता-भगिनींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्व प्रकरणांबाबत जनजागृती करण्यासाठी हे मोर्चे काढले जातात. हे मोर्चे सरकारच्या विरोधात काढले जात नाही.
“2004 मध्ये महाराष्ट्रात दंगली घडवून आणण्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. त्यामुळे सध्या राज्यामध्ये घडत असलेल्या दंगलीं मागं उद्धव ठाकरे मास्टरमाइंड आहे का? याबाबत चौकशी करण्यात यावी. महाविकास आघाडीला मुघलांचं राज्य परत आणायचं असेल तर आम्ही आमच्या स्वराज्याच्या लढाईसाठी तयार आहोत”, असेही ते (Nitesh Rane) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Monsoon Update | दिलासादायक! चक्रीवादळ सक्रिय असताना मान्सूनबाबत समोर आली आनंदाची बातमी
- Kolhapur Protest | तीव्र आंदोलनामुळं कोल्हापुरातील इंटरनेट सेवा उद्या संध्याकाळपर्यंत बंद
- WTC Final | WTC फायनलचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार? जाणून घ्या
- Nilesh Rane | कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार; निलेश राणेंचा पवारांवर घणाघात
- Instagram Story | युजर्स संतापले! तुमच्या पण इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ‘हा’ बदल दिसतोय का?