Monsoon Update | अखेर प्रतीक्षा संपली! केरळमध्ये पुढील 24 तासांत दाखल होणार मान्सून

Monsoon Update | टीम महाराष्ट्र देशा: अरबी समुद्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biperjoy) सक्रिय झाल्यामुळे मान्सूनसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती. अशात हवामान खात्याने एक दिलासादायक बातमी दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

Heavy rains are likely in some states due to the cyclone

साधारणता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केरळमध्ये मान्सून (Monsoon Update) दाखल होण्याची शक्यता असते. मात्र, यंदा मान्सूनसाठी अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे. ही प्रतीक्षा लवकरच संपणार असून येत्या 24 तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रात सक्रिय असलेल्या चक्रीवादळामुळे पुढील 24 तासात काही राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, अरबी समुद्रामध्ये सक्रिय असलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागामध्ये पाऊस पडू शकतो. सिंधुदुर्ग, मुंबई, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

येत्या 24 तासांमध्ये हे चक्रीवादळ उत्तरेकडे जाण्याची शक्यता असल्याचं हवामान तज्ञ कृष्णकांत होसळीकर (Krishnanand Hosalikar) यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत केरळमध्ये मान्सून (Monsoon Update) दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.