Rahul Narwekar | मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेणार आहे; राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं

Rahul Narwekar | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालाची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवली आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेवर (16 disqualified MLAs) विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार? याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सत्ता संघर्षाच्या निकालावर प्रतिक्रिया देतांना राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) म्हणाले, “लवकरच मी क्रांतिकारी निर्णय घेणार आहे. ज्याप्रमाणे बाळासाहेब देसाई यांनी 1977 साली विधानसभेचे अध्यक्ष पद भूषवून क्रांतिकारी निर्णय घेतले होते, त्याचप्रमाणे मी सुद्धा निर्णय घेणार आहे.”

I will decide on merit only

पुढे बोलताना ते (Rahul Narwekar) म्हणाले, “कुणालाही चिंता करण्याची काहीच गरज नाही. कारण मी मेरिटनुसारच निर्णय घेणार आहे. बाळासाहेब देसाईंनी ज्याप्रमाणे निर्णय घेतले होते. त्यातूनच शिकून मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेणार आहे.”

दरम्यान, 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. अशात राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.