Monsoon Update | आनंदाची बातमी! केरळमध्ये मान्सून दाखल, हवामान विभागाची माहिती

Monsoon Update |  मान्सूनबाबत सध्या एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मान्सून केरळमध्ये (Monsoon in Kerala) दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) याबाबत माहिती दिली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एका आठवड्यानंतर केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. देशात मान्सूनचं आगमन झालं असून आता लवकरच मान्सूनचं राज्यात आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. केरळमधील बहुतांश भागामध्ये आज सकाळपासून पाऊस पडत आहे. दरवर्षी मान्सून १ जूनला केरळमध्ये दाखल होत असतो मात्र यंदा मान्सून आठ दिवस उशिरा दाखल झाला आहे.

तळकोकणामध्ये १६ जूननंतर मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे लोकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. पुढील ४८ तासांमध्ये बंगालचा उपसागर आणि केरळच्या बऱ्याचशा भागात मान्सून पोहचणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

महत्वाच्या बातम्या –

Back to top button