Ban Chowk Cinema – गणेशोत्सव म्हणजे गुंडगिरी, मारामाऱ्या; चौक चित्रपटाने हिंदूंच्या भावना दुखावल्या

Ban Chowk Cinema – नुकताच प्रदर्शित झालेला चौक चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी पतित पावन संघटनेने केली आहे. चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि टिम वर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे. तसेच गुन्हेगारी विश्वातून आर्थिक देवाण घेवाण ( Financial transfer from the criminal world ) करण्यात आली असावी म्हणूनच गुन्हेगारी पुरस्कृत चित्रपटाची मालिका दिग्दर्शक आणि टिम कडून सुरु आहे ? असा आरोप करण्यात येत आहे.

गणेशोत्सव भक्तांना बदनाम करण्याचं काम

पुणे शहर हे विद्येचे आणि सांस्कृतिक शहर म्हणून जगभरात नावलौकीक पावलेले आहे. पुणे शहरातील गणेशोस्तव हा पुणे शहराचा आत्मा आहे आणि गणेशोत्सव कार्यकर्ता हा समाजमनाच्या रक्तवाहिन्या आहेत. गणेशोत्सव आणि गणेशोत्सव भक्तांना बदनाम करण्याचं काम चौक या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Chowk movie hurt Hindus sentiments

चौक चित्रपट गुन्हेगारी वृत्तीच समर्थन व गुन्हेगारीला खतपाणी घालणारा आहे. चित्रपटात गणेशोत्सव म्हणजे गुंडगिरी, मारामाऱ्या दाखवण्यात येत असल्याचा आरोप पतित पावन संघटनेने केला आहे. चौक चित्रपटाने हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. चित्रपटावर बंदी घालून संबंधित दिग्दर्शक आणि टिम वर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्तांना संघटनेकडून पत्र देण्यात आले.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, पुणे शहर अध्यक्ष स्वप्निल नाईक, यादव पुजारी, विजय क्षीरसागर, पियूष वाईकर, योगेश वाड़ेकर, राहुल शिंदे आदि पदाधिकारि  उपस्थित होते.

थोडक्यात चित्रपटाविषयी – Chowk Cinema Fact 

सार्वजनिक गणेशोत्सवात विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीत कोणाचा बाप्पा पुढे जाणार? यावरून भांडण, राडा होतो. एका गटातील तरुण दुसऱ्या गटातील तरुणाच्या थोबाडीत मारतो. ज्याच्या थोबाडीत पडते तो स्थानिक नगरसेवकाचा भाऊ असतो. थोडक्यात काय तर अपमानाचा बदला घेण्याची गोष्ट. त्यातून मारामाऱ्या आणि खून.  तुम्ही ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमा पाहिला असेल तर हि ‘पॅटर्न’ची पुढची आवृत्ती आहे. ‘चौक’ मुळशी पॅटर्न २ आहे. दिशाहीन कथानक आणि गुंडगिरी, मारामाऱ्या चित्रपटात आहेत.

‘चौक’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांचे असून चौक चित्रपटातुन देवेंद्र गायकवाड दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. यापूर्वी त्यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव या चित्रपटांमध्ये भूमिका केली होती.

चौक निर्मिती : दिलीप पाटील

चौक कलाकार : उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, किरण गायकवाड, शुभंकर एकबोटे, अक्षय टंकसाळे, संस्कृती बालगुडे, स्नेहल तरडे

चौक छायांकन, संकलन : मयूर हरदास

महत्वाच्या बातम्या –

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.