Gopichand Padalkar |अहमदनगर: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा एकेरी उल्लेख केला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर भडकले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी पडळकर यांना इशारा दिला आहे. आपली उंची किती आपण बोलतो किती?, अशा खोचक शब्दात निलेश लंके यांनी पडळकरांवर टीकास्त्र चालवलं आहे.
Sharad Pawar is a Diamond of Maharashtra
माध्यमांची बोलत असताना निलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले, “गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांची उंची किती ते बोलतात किती? शरद पवार राज्याला मिळालेला एक हिरा आहे. महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत शरद पवार आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक विकास कामं मार्गी लागली आहेत.
पुढे बोलताना ते (Gopichand Padalkar) म्हणाले, “शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या माणसाचा सुसंस्कृतीसोबत काहीच संबंध नसेल. सध्या शाळांना सुट्ट्या सुरू असल्यामुळे संस्कार वर्ग शिबिर सुरू आहेत. या लोकांना संस्कार शिबिराला पाठवण्याची अत्यंत गरज आहे. शरद पवार यांनी आम्हाला उत्तम शिकवनूक दिली आहे, नाहीतर पडळकरांसारख्या लोकांना नीट करायला आम्हाला वेळ लागला नसता.”
दरम्यान, गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत पडळकर यांनी अरे-तुरेची भाषा वापरली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | औरंग्यांना भाजपकडून ताकद पुरवली जाते; संजय राऊतांचा गंभीर आरोप
- Gopichand Padalkar | “छत्रपती शिवाजी महाराज नसते तर शरद पवार शमशुद्दीन तर अजित हा अझरुद्दीन असता “- गोपीचंद पडळकर
- Ban Chowk Cinema – गणेशोत्सव म्हणजे गुंडगिरी, मारामाऱ्या; चौक चित्रपटाने हिंदूंच्या भावना दुखावल्या
- Sharad Pawar | कोण शरद पवार? मी नाही ओळखत; केंद्रीय मंत्र्यांनं पवारांना डिवचलं
- Rahul Narwekar | मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेणार आहे; राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं