Chitra Wagh | मुंबई: मुंबईतील मरीन लाईन्स येथे महिला वस्तीगृहात एका तरुणीची हत्या झाली होती. त्यानंतर मीरा रोड परिसरात एका महिलेची हत्या झाल्याचा प्रकरण समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. सुप्रिया सुळे यांच्या टीकेला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत सुप्रिया सुळे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. तुमचं सरकार होतं तेव्हा तुमच्या संवेदना मुलींसाठी जाग्या झाल्या नाही. त्याचबरोबर तुमच्या गृहमंत्र्यांना श्रद्धा वालकरची हाक ऐकू आली नव्हती, असं चित्रा वाघ ट्विट करत म्हटलं आहे.
Chitra Wagh Tweet
सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटली असेल… किती सोयीस्करपणे तुमच्या संवेदना जाग्या होताहेत हो @supriya_sule
तुमच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मंचरच्या मुलीसाठी तुमच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत.. मुलीला मुस्लिम तरूणानं पळवून नेलं. ती अडीच वर्ष सापडली नाही. तेंव्हा तुमचंच लाडकं सरकार होतं..
श्रद्धा वालकर प्रकरणात तुम्ही वेळीच लक्ष दिलं असतं तर तिचेही 35 तुकडे झाले नसते. वसुलीत मग्न असलेल्या तुमच्या गृहमंत्र्यांना श्रद्धा वालकरच्या आई वडिलांची हाक ऐकू आली नाही, हे ही दुर्दैवच !
मीरा रोड प्रकरणात नक्कीच कारवाई होईल. दोषींची गय केली जाणार नाही कारण इथे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस जी @Dev_Fadnavis
या सक्षम नेत्याकडे आहे.
त्यासाठी तुम्हाला ‘मगरमच्छ के आंसू’ गाळण्याची गरज नाही,मोठठ्या ताई…
सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटली असेल… किती सोयीस्करपणे तुमच्या संवेदना जाग्या होताहेत हो @supriya_sule
तुमच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मंचरच्या मुलीसाठी तुमच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत.. मुलीला मुस्लिम तरूणानं पळवून नेलं. ती अडीच वर्ष…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 8, 2023
दरम्यान, कोल्हापूर आंदोलन प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “मला आश्चर्य आणि गंमत वाटते की भाजप सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण सारखाच दूषित होत आहे. राज्यामध्ये सारख्या दंगली होत राहिल्या तर राज्याचं नुकसान होणार आहे. राज्यामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे जनता घाबरली आणि बिथरली आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Gopichand Padalkar | …तर गोपीचंद पडळकर यांना नीट करायला वेळ लागणार नाही; राष्ट्रवादीच्या आमदाराने दिला थेट इशारा
- Sanjay Raut | औरंग्यांना भाजपकडून ताकद पुरवली जाते; संजय राऊतांचा गंभीर आरोप
- Gopichand Padalkar | “छत्रपती शिवाजी महाराज नसते तर शरद पवार शमशुद्दीन तर अजित हा अझरुद्दीन असता “- गोपीचंद पडळकर
- Ban Chowk Cinema – गणेशोत्सव म्हणजे गुंडगिरी, मारामाऱ्या; चौक चित्रपटाने हिंदूंच्या भावना दुखावल्या
- Sharad Pawar | कोण शरद पवार? मी नाही ओळखत; केंद्रीय मंत्र्यांनं पवारांना डिवचलं