Thackeray Group | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यामध्ये औरंगजेबाच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. औरंगजेबाचे पोस्टर आणि फोटो स्टेटसला ठेवल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. एकीकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांना जीवे-मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती मिळाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबद्दल ट्विट केलं आहे.
Do you consider yourself a descendant of the Chhatrapati?
ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रवक्ते आनंद दुबे (Anand Dubey) इंडिया टीव्हीवर एका चर्चासत्रामध्ये सामील झाले होते. चर्चासत्र सुरू असताना त्यांना फोन आला. मात्र सत्र सुरू असल्यामुळे ते फोन उचलू शकले नाही. चर्चासत्र संपल्यानंतर त्यांनी त्या नंबरवर कॉल केला. “तू स्वतःला छत्रपतींचा वंशज समजत आहे का? जास्त बोलू नको. जास्त बोलला तर तुला गोळ्या घालीन”, फोन उचलताचं समोरील व्यक्तीनं या भाषेत त्यांना जीवे-मारण्याची धमकी दिली.
'बड़ा छत्रपति का वंशज बन रहा है क्या, तेरी…', शिंदे गुट के नेता ने उद्धव गुट के प्रवक्ता को दी गोली मारने की धमकी.. | via @IndiaTVHindi https://t.co/4LWze4y5sm
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 8, 2023
शिंदे गटाकडून हा फोन कॉल आला असल्याचं आनंद दुबे (Thackeray Group) यांनी म्हटलं आहे. शिंदे गटातील संजय माशेलकर यांनी हा फोन कॉल केला असल्याचा दावा दुबे यांनी केला आहे. तर या सर्व प्रकरणावर मुंबईच्या समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचंही दुबे यांनी सांगितलं आहे.
या सर्व प्रकरणावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, “राज्यामध्ये हे काय घडत आहे. शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे काल एका टीव्ही चॅनलवर लाईव्ह असताना त्यांना धमकवण्यात आलं. हे सर्व घडूनही देवेंद्र फडणवीस शांत बसले आहे. तुम्ही काय विरोधकांना मारण्याची सुपारी घेतली आहे का? महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं सरकार आहे.”
महाराष्ट्र में क्या हो रहा है?
ये कैसी हालत खोके सरकारने बना रखी हैं ?
शिवसेना प्रवक्ता आनंद दुबे जी कल एक टीव्ही न्यूज शो पर चर्चा कर रहे थे तो उन्हे ऑन एअर धमकाया गया..गृहमंत्री फडणविस मुकदर्शक बने बैठे हैं. क्या अपने राजनैतिक विरो धियोकी हत्या करने की सुपारी सरकारने दी…— Sanjay Raut (@rautsanjay61) June 8, 2023
महत्वाच्या बातम्या
- Pune University | कौतुकस्पद! कंदील लावुन अभ्यास करणारा मुलगा झाला पुणे विद्यापीठाचा कुलगुरू
- Chitra Wagh | महाविकास आघाडी आणि औरंगजेबाचा DNA एकच; संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांचा DNA तपासावा – चित्रा वाघ
- Monsoon Update | आनंदाची बातमी! केरळमध्ये मान्सून दाखल, हवामान विभागाची माहिती
- Chitra Wagh | सुप्रिया ताईंची रंग बदलण्याची कला पाहून सरड्यालाही लाज वाटेल – चित्रा वाघ
- Gopichand Padalkar | …तर गोपीचंद पडळकर यांना नीट करायला वेळ लागणार नाही; राष्ट्रवादीच्या आमदाराने दिला थेट इशारा