Pune University | कौतुकस्पद! कंदील लावुन अभ्यास करणारा मुलगा झाला पुणे विद्यापीठाचा कुलगुरू

Pune University | पुणे: शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. डॉ. सुरेश गोसावी (Prof. Dr. Suresh Gosavi) यांची नियुक्ती झाली आहे. प्रा. गोसावी यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत खडतर होता. त्यांच्या या प्रवासाबाबत त्यांच्या आई-वडिलांनी माहिती दिली आहे. मुलगा कुलगुरू पदावर विराजमान झाल्यानंतर आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आहेत.

Prof. Gosavi’s educational journey was very tough.

प्रा. गोसावी मूळचे जळगाव जिल्ह्यातील धामणगाव येथील रहिवासी आहे. त्यांचे वडील वामनगीर गोसावी हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. ते प्रा. गोसावी यांच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल बोलले आहे. प्रा. गोसावी (Pune University) यांच्या वडिलांनी सांगितले, मी एक शिक्षक असल्यामुळे माझ्या सातत्याने बदली होत होत्या.

डॉ. गोसावी यांचं प्राथमिक शिक्षण धामणगाव तालुक्यातील चांदसर येथे पूर्ण झालं. त्यांनी त्यांची दहावी किनगाव तालुक्यामध्ये पूर्ण केली. शाळेचा अभ्यास करताना प्रा. गोसावी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. गावात वीज नसल्यामुळे ते रात्री उशिरापर्यंत कंदील लावून अभ्यास करायचे. कुणाचीही मदत न घेता अभ्यासाची मूळ पुस्तकं वाचून ते अभ्यास करायचे.

पुढे अकरावी-बारावी सायन्समध्ये पूर्ण केल्यानंतर त्यांनी नूतन मराठवाडा महाविद्यालयातून बीएससी इलेक्ट्रॉनिक विषयातून पदवी ग्रहण केली. त्यानंतर ते पुढील शिक्षण घेण्यासाठी पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. पदव्युत्तर शिक्षण संपल्यानंतर प्रा. गोसावी मेहनत, अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर कुलगुरू (Pune University) पदापर्यंत पोहोचले, असही त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.