Weather Update | केरळमध्ये मान्सून दाखल, तर महाराष्ट्रामध्ये कधी येणार पाऊस?

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: यंदा वादळी वाऱ्यामुळे केरळमध्ये उशिराने मान्सून (Monsoon ) दाखल झाला आहे. काल प्रतीक्षा संपलेली असून मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळनंतर महाराष्ट्रात कधी पाऊस येणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण राज्यात मुंबईसह बहुतांश ठिकाणी उन्हाचा चटका कायम आहे.

Monsoon has entered Kerala

यंदा केरळमध्ये तब्बल एक आठवडा उशिराने मान्सून दाखल झाला आहे. केरळनंतर मान्सून आता कर्नाटक आणि तमिळनाडूच्या दिशेने पुढे येत आहे. येत्या 24 तासात कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर महाराष्ट्रामध्ये  साधारण 18 जून पर्यंत मान्सून येण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रामध्ये सक्रिय असलेलं बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biperjoy) आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांत या चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे. पुढील तीन दिवसांमध्ये हे चक्रीवादळ उत्तर भारताकडे सरकणार असल्याची माहिती हवामान खात्याने (Weather Update) दिली आहे.

दरम्यान, केरळमध्ये साधारण 1 जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता असते. मात्र, यावर्षी मान्सून केरळमध्ये 8 जून रोजी दाखल झाला आहे. त्यामुळे राज्यात 18 जून पर्यंत मान्सूनचा पाऊस येण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त (Weather Update) केली आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button