RBI Governor | 500 रुपयांच्या नोटांवर बंदी? पुन्हा चलनात येणार 1000 रुपयाची नोट? RBI गव्हर्नर म्हणतात…

RBI Governor | टीम महाराष्ट्र देशा: रिझर्व बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने 19 मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली आहे. त्याचबरोबर 30 सप्टेंबर पर्यंत 2000 हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिले आहे. त्यानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा देखील बंद होणार असल्याचं म्हटलं जात होतं. याच पार्श्वभूमीवर आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी माहिती दिली आहे.

RBI is considering demonetisation of Rs 500 notes

500 आणि 1000 रुपयांच्या नोटांच्या बंदीबाबत आरबीआय (RBI Governor) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी माहिती दिली आहे. “500 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा आरबीआय विचार करत आहे. त्याचबरोबर 1000 रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याचा विचार आरबीआय करत आहेत”, असं पीटीआयच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना आरबीआय (RBI Governor) गव्हर्नर म्हणाले, “2000 हजार रुपयांची नोट बंद केल्यानंतर तब्बल 1.8 लाख कोटी रुपयांच्या दोन हजार नोटा परत आल्या आहेत. व्यवहारामध्ये 31 मार्च 2023 पर्यंत जेवढ्या दोन हजार रुपयांच्या नोटा होत्या. त्याच्या अर्ध्या नोटा परत मिळाल्या आहे.

दरम्यान, 2000 हजार रुपयाची नोट बंद केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. संजय राऊत म्हणाले, “गाजावाजा करत दोन हजाराची नोट बाजारात आणली होती. आता ती बंद केली आहे.” मोदी सरकार अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा करत आहे, असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.

महत्वाच्या बातम्या