Sharad Pawar | मुंबई: राज्यातील राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. या धमकीनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Supriya Sule has filed a complaint to the police
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकी मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पवार साहेबांच्या नावाने माझ्या व्हाट्सअपवर मेसेज आला आहे. एका वेबसाईटच्या माध्यमातून शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मी न्याय मागायसाठी पोलिसांकडे आले आहे.”
#WATCH | Mumbai | "I received a message on WhatsApp for Pawar Sahab. He has been threatened through a website. So, I have come to the Police demanding justice. I urge Maharashtra Home Minister and Union Home Minister. Such actions are low-level politics and this should stop..,"… pic.twitter.com/C7zwuJlzQq
— ANI (@ANI) June 9, 2023
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “माझी देशाच्या आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी करावी. पवार साहेब (Sharad Pawar) देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी गृह खात्याची आहे.”
धमकी देणाऱ्या ट्विटमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. तुमचाही दाभोळकर होणार असा उल्लेख या ट्विटमध्ये करण्यात आला आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्याचबरोबर या प्रकरणावरून राज्यात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Keshav Upadhye | महाविकास आघाडी हाच एक प्रकारचा लव्ह जिहाद आहे – केशव उपाध्ये
- Ashadhi Wari | “…नाहीतर वारी थांबवली जाईल”; वारकरी साहित्य परिषदेचा राज्य शासनाला थेट इशारा
- Nilesh Rane | हिम्मत असेल तर राष्ट्रवादीनं जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात आंदोलन करून दाखवावं; राष्ट्रवादीला निलेश राणेंचं खुलं चॅलेंज
- Gautami Patil | “गौतमीताई थोडी लावणीची तयारी करून या, नाहीतर…”; छोट्या पुढारीचा गौतमी पाटीलला इशारा
- Weather Update | केरळमध्ये मान्सून दाखल, तर महाराष्ट्रामध्ये कधी येणार पाऊस?