Chitra Wagh | मुंबई: भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर टीका केली होती. सत्ता काय गेली सत्तेसोबत आव्हाडांची मतीही गेली, असा शाब्दिक हल्लाबोल चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाडांवर केला होता. तुम्ही खूप खालच्या पातळीवर जाऊन बोलता, मला त्यानी बोलावे ज्याचे हात स्वछ आहे, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांना उत्तर दिलं. आता पुन्हा एकदा चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीकास्त्र चालवलं आहे.
Jitendra Awhad your brain is rotten
चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत जितेंद्र आव्हाडांवर पुन्हा एकदा शाब्दिक हल्लाबोल केला आहे. ट्विट करत चित्रा वाघ म्हणाल्या, “जितेंद्र आव्हाड तुमचा मेंदू सडलेला आहे आणि तुम्ही ते सिद्ध करून दाखवला आहे. माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताय, तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी यापूर्वीही अशा प्रसंगांना सामोरे गेलेय.”
“बहिण म्हणून चारित्र्य हनन करणारी तुमच्या सारखी औलाद महाराष्ट्रात जन्माली आली हेच दुर्देव आहे. माझा राजकीय प्रवास तुमच्यासारखा नाही. तुम्ही जेव्हा ‘कुलू मनाली’ करत होता तेव्हा माझा संघर्ष सुरू होता”, असही त्या (Chitra Wagh) या ट्विटमध्ये म्हणाल्या आहे.
पुढे ट्विटमध्ये त्या (Chitra Wagh) म्हणाल्या, “परमारच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार आणि त्यातून वाचवा म्हणत किती जणांचे किती वेळा पाय धरलेत हे सर्वांना माहिती आहे. तुमच्या बॉडीगार्डची आत्म हत्या होती की हत्या केली तुम्ही त्याची ही चौकशी व्हायला हवी तुमचा पीए कशामुळे तडीपार झाला, हेही लपून राहिलेलं नाही पण मला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाहीये तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे ते पोलिसच बाहेर काढतील.”
“मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा गिधाड आहेस तू ..तुमच्यासारख्या गिधाडांना मी सोडणार नाही आणि आत्ताही तुम्हाला पुरून उरणार. आव्हाड नाहीसचं तू हाड हाड आहेस आणि तीच तुझी लायकी आहे. राजकीय मुद्द्यांवर बोलता येत नसेल तर तुझं थोबाड बंद ठेव माझ्या नादी लागू नकोस हे लक्षात ठेव,” अशा खोचक शब्दात त्यांनी (Chitra Wagh) ट्विट करत आव्हाडांवर टीकास्त्र चालवलं आहे.
दरम्यान, पत्रकार परिषदेत जाहीररित्या शिवीगाळ करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा मेंदूही त्यांच्या स्वभावाप्रमाणे सडक चाललाय, असं चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं.
Jitendra Awad Tweet
ताई मी कुठली ही शिवी दिली नाही ….. फक्त मला munmy कोणाची तोंड उघडायला लावू नका … मी तुमची खूप इज्जत करत आलो आहे … तुम्हारे शिशे के घरपे हम पत्थर मार सकते है …. हमाम मै सब नंगे है …….Baपूआर्मस्ट्राँग ….. आठवत असेल ना …ह्या पुढे स्वभावा प्रमाणे वागीन… एंटी चैम्बर … मधले… https://t.co/DatnmGbb1x
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 8, 2023
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | “दाभोळकरांप्रमाणे तुम्हालाही…”; शरद पवार यांना जिवे-मारण्याची धमकी
- Keshav Upadhye | महाविकास आघाडी हाच एक प्रकारचा लव्ह जिहाद आहे – केशव उपाध्ये
- Ashadhi Wari | “…नाहीतर वारी थांबवली जाईल”; वारकरी साहित्य परिषदेचा राज्य शासनाला थेट इशारा
- Nilesh Rane | हिम्मत असेल तर राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात आंदोलन करावे – नितेश राणे
- Gautami Patil | “गौतमीताई थोडी लावणीची तयारी करून या, नाहीतर…”; छोट्या पुढारीचा गौतमी पाटीलला इशारा