Sandipan Bhumre | उद्धव ठाकरे का गेले होते शरद पवार-सोनिया गांधीना भेटायला? त्यांचे बाप कोण? आई कोण? – संदीपान भुमरे

Sandipan Bhumre | छत्रपती संभाजीनगर: राज्यातील राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत असतात. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संदीपान भुमरे यांच्यावर टीका केली होती. तुम्ही शिवसेना आमची आहे म्हणतात, मग तुमचा बाप कोण आहे? नरेंद्र मोदींना तुम्ही बाप मानणार आहात का? असा प्रश्न संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला होता.

Our father is Balasaheb Thackeray –Sandipan Bhumre

संजय राऊत यांच्या या प्रश्नाला संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. संदिपान भुमरे म्हणाले, “आमचे बाप बाळासाहेब ठाकरे आहेत. बाळासाहेबांमुळे आम्ही घडलो आहोत. तेव्हा संजय राऊत नव्हते. त्यामुळे संजय राऊत यांनी आम्हाला ही भाषा शिकू नये.”

Who is Uddhav Thackeray father – mother? – Sandipan Bhumre

पुढे बोलताना ते (Sandipan Bhumre) म्हणाले, “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना भेटायला गेले होते तेव्हा संजय राऊत बोलले होते. पण मग उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) का गेले होते सोनिया गांधींना (Sonia Gandhi) भेटायला? त्यांचा बाप कोण आहे? त्यांची आई कोण आहे? ते का जातात मग त्यांना भेटायला? ते शरद पवारांना भेटायला जातात. मग शरद पवार त्यांचे बाप आहे का? संजय राऊत यांनी आमचा बाप काढू नये.”

“आम्ही सांगतो आमचा बाप बाळासाहेब आहे. आज, उद्या आणि आयुष्यभर आम्ही हेच म्हणणार की बाळासाहेबांमुळे आम्ही घडलो आहोत”, असंही ते (Sandipan Bhumre) यावेळी म्हणाले.

We will accept the decision given by the Assembly Speaker

मी लवकरच एक क्रांतिकारी निर्णय देणार आहे, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देत भुमरे (Sandipan Bhumre) म्हणाले, “विधानसभा अध्यक्ष जो काही क्रांतिकारी निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय देखील आम्हाला मान्य असेल.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.