Shubman Gill | कर्णधार पदाचा तिढा सुटला; हार्दिकनंतर शुभमन गिल करणार गुजरातचं नेतृत्व

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shubman Gill | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग ( Indian Premier League ) म्हणजेच आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे.

आयपीएल 2024 मध्ये क्रिकेट चाहत्यांना अनेक संघात मोठे बदल झालेले दिसणार आहेत. काही संघातील खेळाडू बदललेले दिसणार आहे तर काही संघाचे कर्णधार बदललेले दिसणार आहे.

आयपीएलच्या येत्या हंगामामध्ये आपल्याला गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) या संघाचा धुरा नवीन युवा फलंदाज सांभाळताना दिसणार आहे.  शुभमन गिल ( Shubman Gill ) आयपीएल 2024 मध्ये गुजरातचे नेतृत्व करणार आहे.

हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya ) नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने गेल्या दोन आयपीएल हंगामामध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे.

अशात आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स संघासोबत न खेळता मुंबई इंडियन्स संघासोबत खेळणार आहे.

Shubman Gill will be the captain of Gujarat Titans in IPL 2024

हार्दिक मुंबईत परतल्यानंतर गुजरात समोर कर्णधार पदाबाबत मोठा प्रश्न उभा राहिला होता. गुजरातने हा प्रश्न सोडवत संघाचं नेतृत्व शुभमन गिलकडे ( Shubman Gill ) सोपवलं आहे. कारण गेल्या आयपीएल हंगामामध्ये त्याने ( Shubman Gill ) उत्कृष्ट खेळी खेळत स्वतःला सिद्ध केलेलं आहे.

शुभमन गिलने ( Shubman Gill ) गेल्या आयपीएल हंगामामध्ये 17 डावात 890 धावा करत ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली होती. गेल्या आयपीएल हंगामामध्ये केलेल्या मेहनतीचं त्याला ( Shubman Gill ) या आयपीएल हंगामामध्ये फळ मिळालं आहे.

दरम्यान, शुभमन गिलने ( Shubman Gill ) आयपीएल 2024 मध्ये गुजरात टायटन्स नेतृत्व चांगल्या प्रकारे केलं तर तो भारतीय संघाच्या भविष्यातील कर्णधारांच्या रेसमध्ये सामील होऊ शकतो.

कारण बीसीसीआय रोहित शर्मानंतर एकदिवसीय संघाचा कर्णधार कोण असेल? याबाबत चाचपणी करत आहे. त्यामुळे गिलने ( Shubman Gill )  त्याची ही जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली तर तो टीम इंडियाचं नेतृत्व देखील करू शकतो.

महत्वाच्या बातम्या

Hardik Pandya | गुजरातच्या चिंतेत भर; हार्दिक पांड्या गुजरातला सोडून मुंबईत परतला
Chhagan Bhujbal | शिंदे समिती बरखास्त करा, आम्ही मराठ्यांची मागणी कधीच मान्य करणार नाही – छगन भुजबळ
Bank Job | SBI मध्ये नोकरीची संधी! 5447 रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
Sanjay Raut | एकत्र बसून मार्ग काढा, एकमेकांना आव्हान देत बसू नका; संजय राऊतांनी भुजबळ-जरांगेंना झाप-झाप झापलं
Maratha Reservation | वेळ पडल्यास भुजबळांची गाडी फोडू शकतो; स्वराज्य संघटनेचा इशारा