Chhagan Bhujbal | शिंदे समिती बरखास्त करा, आम्ही मराठ्यांची मागणी कधीच मान्य करणार नाही – छगन भुजबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chhagan Bhujbal | पुणे: राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाने ( Chhagan Bhujbal ) विरोध दर्शवला आहे.

यानंतर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झालेली दिसली. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

आम्ही मराठ्यांची मागणी कधीच मान्य करणार नाही, असं छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे.

Dissolve the Shinde Committee – Chhagan Bhujbal

छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal )  म्हणाले, “मराठवाड्यातील कुणबींना कुणबी असून प्रमाणपत्र मिळत नाही. मराठवाड्यातील या नोंदी सापडण्यासाठी शिंदे समिती स्थापन करण्यात आली होती.

त्याचबरोबर हा मूळ मुद्दा होता. त्यासाठी आमचा विरोध नव्हता. परंतु, त्यानंतर जे काही सुरू झालं त्याला आमचा विरोध आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंद शोधा, असं आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं.

शिंदे समितीचं काम आता संपलेलं आहे. त्यामुळे ती समिती आता बरखास्त करा. मराठवाड्यातील काम आता संपलेलं आहे.

महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, ही मागणी आम्ही कधीच मान्य केली नव्हती आणि कधी करणारही नाही. त्याचबरोबर कायद्यात सुद्धा ही मागणी बसत नाही.

मराठा समाज हा ओबीसीत बसत नाही, असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. संविधानामध्ये एक विशेष तरतूद आहे. गरज असेल तर राज्य सरकार एखाद्या विशिष्ट परिस्थितीत आरक्षण देऊ शकतो.

त्यानुसार ते आरक्षण घेऊ शकतात. मात्र, त्यांना ते नकोय. त्यांना कुणबी प्रमाणपत्र हवं आहे. त्यांची ही मागणी अत्यंत चुकीची आहे. त्याचबरोबर त्यांच्या या मागणीवरून सुप्रीम कोर्टाचा अपमान होत आहे.”

महत्वाच्या बातम्या

Bank Job | SBI मध्ये नोकरीची संधी! 5447 रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Sanjay Raut | एकत्र बसून मार्ग काढा, एकमेकांना आव्हान देत बसू नका; संजय राऊतांनी भुजबळ-जरांगेंना झाप-झाप झापलं 

Maratha Reservation | वेळ पडल्यास भुजबळांची गाडी फोडू शकतो; स्वराज्य संघटनेचा इशारा

Manoj Jarange | ओबीसी नेते जाणून-बुजून वातावरण दूषित करताय; जरांगेंचा भुजबळांना टोला

Hardik Pandya | रोहित शर्माची सुट्टी? मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार हार्दिक पांड्या