Manoj Jarange | ओबीसी नेते जाणून-बुजून वातावरण दूषित करताय; जरांगेंचा भुजबळांना टोला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने आला आहे.

कारण मराठा समाजाने केलेल्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) राज्यामध्ये जागोजागी मेळावे घेताना दिसत आहे.

या मेळाव्यामध्ये बोलत असताना त्यांनी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांच्यावर खोचक टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे  ( Manoj Jarange ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी नेते जाणून-बुजून वातावरण दूषित आहे, असं मनोज जरांगे  ( Manoj Jarange ) यांनी म्हटलं आहे.

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे  ( Manoj Jarange )  म्हणाले, “शांततेत आंदोलन करा, असं माझं मराठा समाजाला जाहीरपणे सांगणं आहे.

24 डिसेंबर मराठ्यांसाठी चांगला दिवस ठरणार आहे. त्यामुळे ओबीसीचे काही नेते जाणून-बुजून वातावरण दूषित करत आहे. मराठा समाजाने त्यांच्याकडे लक्ष न देता शांत रहावं.”

I have appealed to the Maratha community to remain calm – Manoj Jarange

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काल स्वराज्य संघटनेने छगन भुजबळ यांचा ताफा अडवला होता.

यावेळी बोलत असताना मनोज जरांगे  ( Manoj Jarange ) यांनी यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण करायचं आहे, त्यामुळे मराठा समाजाला मी शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.

ओबीसी नेत्यांना मराठ्यांचं चांगलं होऊ द्यायचं नाही. त्यामुळे मराठा समाजाने शांततेत राहावं. ओबीसी नेत्यांचं वातावरण दूषित करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. त्यामुळे सर्वांनी शांत रहा.”

महत्वाच्या बातम्या