Gujarat Titans | गुजरातच्या डोकेदुखीत वाढ; हार्दिक पांड्यानंतर कोण असेल कर्णधार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gujarat Titans | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग ( Indian Premier League ) म्हणजेच आयपीएल ( IPL ) 2024 मध्ये आपल्याला अनेक संघांमध्ये मोठे बदल झालेले दिसणार आहे. 19 डिसेंबर 2024 रोजी दुबई येथे आयपीएल 2024 चा लिलाव होणार आहे. तत्पूर्वी मोठी बातमी समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) गुजरात टायटन्सला ( Gujarat Titans ) रामराम ठोकणार असून तो पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये ( Mumbai Indians ) सामील होणार आहे. या माहितीनंतर गुजरातचा ( Gujarat Titans ) पुढचा कर्णधार कोण असेल? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

Who will lead the team after Hardik?

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने ( Gujarat Titans ) आयपीएलच्या दोन्ही हंगामामध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे.  अशात हार्दिक पांड्या हा ( Gujarat Titans ) संघ सोडणार असून मुंबई इंडियन्समध्ये परतणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

या माहितीनंतर गुजरातचे ( Gujarat Titans ) कोच आशिष नेहरा यांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण हार्दिकनंतर संघाचं नेतृत्व कोण करेल? असा सवाल त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.

अशात शुभमन गिलचं ( Shubman Gill ) नाव समोर येत आहे. हार्दिक पांड्यानंतर शुभमन गिल गुजरात टायटन्सचं ( Gujarat Titans) नेतृत्व करू शकतो.

कारण या खेळाडूने उत्कृष्ट फलंदाजी करत आपली खेळण्याची क्षमता दाखवली आहे. त्यामुळे त्याच्याकडे संघाचं कर्णधार पण सोपवलं जाऊ शकतं.

गिलशिवाय संघाकडे ( Gujarat Titans ) राशिद खान ( Rashid Khan ) देखील कर्णधार पदासाठी उत्तम पर्याय आहे.

हार्दिक पांड्या जेव्हा संघाचा ( Gujarat Titans) कर्णधार होता, तेव्हा राशिद खान संघाचा उपकर्णधार होता. गेल्या आयपीएल हंगामामध्ये हार्दिकच्या अनुपस्थितीमध्ये त्याने अनेकदा संघाचं नेतृत्व केलं होतं. अशात तो देखील संघाचा भावी कर्णधार होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या