Pneumonia China | चीनमधून येतयं नवीन संकट? रहस्यमय व्हायरसमुळे WHO ने दिला सतर्कतेचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pneumonia China  | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही वर्षांपूर्वी चीनमधून कोरोना नावाचा व्हायरस संपूर्ण जगात पसरला होता. कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरून सोडलं होतं. आता कुठे कोविड संपत असताना पुन्हा एकदा नवीन आजाराने ( Pneumonia China ) डोकं वर काढलं आहे.

चीनमधील एका रहस्यमय आजाराने  ( Pneumonia China ) संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव लहान मुलांवर होताना दिसत आहे.

कोरोनाप्रमाणे चीनचे सरकार हा आजार लपवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याची गंभीर दखल घेतली असून इतर देशांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

चीनच्या उत्तर पूर्व भागातील लियाओनिंग भागातील मुलांमध्ये निमोनिया  ( Pneumonia China ) सारखी सौम्य लक्षण आढळून आली आहेत.

श्वास घेण्यात अडचणी येणे, खोकला, फुफ्फुसातला सूज येणे आणि ताप ही याची  ( Pneumonia China )  प्रमुख लक्षणे असल्याचं बोललं जात आहे.

याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. या आजाराचा  ( Pneumonia China ) भारताला धोका कमी असल्याचं बोललं जात आहे. परंतु, ज्या वेगाने चीनमध्ये हा आजार पसरत आहे, त्यामुळे इतर देशांच्या चिंतेत नक्कीच भर पडली आहे.

This mysterious pneumonia is spreading rapidly in China

दरम्यान, चीनमध्ये हा रहस्यमय निमोनिया  ( Pneumonia China ) वेगाने पसरत चालला आहे. त्यामुळे भारत सरकारने अलर्ट जारी केला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारत या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहे. त्याचबरोबर DGHS च्या देखरेखेखाली आरोग्य मंत्रालयाची तातडीची बैठक देखील पार पडली आहे.

चीनमध्ये या व्हायरसचे रुग्ण आढळून आल्यानंतर भारतातील आरोग्य यंत्रणांची पुन्हा तपासणी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या