Share

Maratha Reservation | ओबीसी समाजाची लायकी ठरवणारे मनोज जरांगे कोण? ओबीसींचा खडा सवाल

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी लढत आहे. राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला ( Maratha Reservation ) ओबीसी समाजासह ओबीसी नेते छगन भुजबळ ( Chagan Bhujbal ) यांनी विरोध दर्शवला आहे. यानंतर मराठा आणि … Read more

Published On: 

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी लढत आहे. राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी केली आहे.

त्यांच्या या मागणीला ( Maratha Reservation ) ओबीसी समाजासह ओबीसी नेते छगन भुजबळ ( Chagan Bhujbal ) यांनी विरोध दर्शवला आहे.

यानंतर मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे आणि छगन भुजबळ एकमेकांवर टीका टिपणी करताना दिसले आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे ( Babanrao Taywade ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी समाजाची लायकी ठरवणारे मनोज जरांगे कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Who is Manoj Jarange who determines the worth of OBC community? – Babanrao Taywade

बबनराव तायवाडे म्हणाले, “परवा एका ठिकाणी बोलत असताना मनोज जरांगे म्हणाले, ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं.

त्यांचं हे वक्तव्य संपूर्ण ओबीसी समाजासाठी आहे. ओबीसी समाजाची लायकी नाही, परंतु तरी देखील आम्हाला ओबीसी समाजाच्या हाताखाली काम करावं लागतं, असं त्यांचं म्हणणं असेल तर ओबीसी समाजाची लायकी ठरवणारे हे कोण?

माणसाची लायकी त्याच्या शिक्षणाने, कर्तुत्वाने आणि जातीने ठरत नसते. या देशामध्ये समानतेचं तत्व आहे. त्यामुळे ही जात मोठी ही जात छोटी असं कोणी म्हणू शकत नाही.

संपूर्ण ओबीसी समाजावर त्यांनी टीका केली आहे. अशात ओबीसी समाजाने या टीका का सहन कराव्या? ओबीसी समाजाला त्यांना प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे.

आम्ही त्यांना उत्तर दिल्यावर आम्ही त्यांच्या विरोधात आहे, असं ते म्हणतील. आम्हाला त्यांच्या विरोधात जायचं नाही. त्याचबरोबर त्यांच्या मागणीला  ( Maratha Reservation ) आमचा विरोध नाही. मात्र, बोलत असताना त्यांना त्यांच्या शब्दांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.”

दरम्यान, मराठा समाजाने केलेल्या मागणीला  ( Maratha Reservation ) ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ राज्यामध्ये एल्गार मेळावे घेताना दिसत आहे.

तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या  ( Maratha Reservation ) पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या राज्यामध्ये जागोजागी जाहीर सभा होत आहेत.

हे दोन्ही नेते सभांमध्ये बोलत असताना एकमेकांवर खालच्या स्तराला जाऊन टीका करताना दिसले आहे. यानंतर ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण होताना दिसला. अशात या प्रकरणावर राज्य सरकार काय तोडगा काढेल? याबाबत आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install