Hardik Pandya | रोहित शर्माची सुट्टी? मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार हार्दिक पांड्या

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hardik Pandya | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग ( Indian Premier League ) च्या लिलावाची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट बघत आहे. 19 डिसेंबर 2023 रोजी दुबई येथे हा लिलाव होणार आहे. तत्पूर्वी आपल्याला अनेक संघात बदल होताना दिसत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya ) गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) ला रामराम ठोकलेला असून तो पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये ( Mumbai Indians ) सामील झाला आहे.

या माहितीनंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma ) च्या आयपीएल करिअरबद्दल चर्चांना उधाण आलं आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या  ( Hardik Pandya ) मुंबई इंडियन संघाचे नेतृत्व करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि निवड समितीचे अध्यक्ष राहिलेले कृष्णमचारी श्रीकांत यांनी हार्दिक पांड्याबद्दल  ( Hardik Pandya ) मोठं वक्तव्य केलं आहे.

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलत असताना त्यांनी हार्दिक पांड्या  ( Hardik Pandya ) मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार असल्याचं म्हटलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर रोहित शर्मा संघाचे कर्णधार पद सोडणार असून हार्दिक पांड्या  ( Hardik Pandya ) संघाचे नेतृत्व करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे.

Who will be the next captain of Gujarat Titans?

दरम्यान, गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याच्या  ( Hardik Pandya ) नेतृत्वाखाली आयपीएलच्या दोन्ही हंगामामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

यंदाच्या आयपीएल हंगामात हार्दिक पांड्या  ( Hardik Pandya ) गुजरातला सोडून मुंबईमध्ये सामील झाला असल्याचं बोललं जात आहे.

त्यानंतर गुजरातच्या चिंतेत भर पडलेली असून संघाचा पुढचा कर्णधार कोण असेल? असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.

यानंतर शुभमन गिल आणि राशिद खान हे दोन नावं समोर आले आहे. या दोन्ही खेळाडूंनी उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यामुळे हार्दिकनंतर या दोघांपैकी एकाकडे संघाचे नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं.

महत्वाच्या बातम्या