Sanjay Raut | एकत्र बसून मार्ग काढा, एकमेकांना आव्हान देत बसू नका; संजय राऊतांनी भुजबळ-जरांगेंना झाप-झाप झापलं 

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्यामध्ये वाद होत आहे.

त्यांच्यातील हा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भुजबळ आणि जरांगे यांना सुनावलं आहे

एकत्र बसून मार्ग काढा, एकमेकांना आव्हान देत बसू नका, असं म्हणत संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांचा समाचार घेतला आहे.

आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले, “सध्या महाराष्ट्रातील वातावरण अत्यंत खराब झालेलं आहे.

यासाठीच आपण महाराष्ट्र स्थापन केला होता का? आजच मी एका नेत्याचं विधान ऐकलं आहे. त्यामध्ये ते दुसऱ्या समाजाला उद्देशून बोलत आहे.

आमच्यातील आरक्षण घेतलं तर तुमच्या तंगड्या तोडू, असं ते म्हणत आहे. अशा प्रकारची भाषा 1947 साली भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी वापरली गेली होती.

एकमेकांचं रक्त सांडू, एकमेकांचे हात पाय तोडू, ही भाषा कधी महाराष्ट्रात वापरली गेली नव्हती. याचा अर्थ असा की या राज्यातील सरकारला कोणीच जुमानत नाही. या सरकारचं कुणीच ऐकत नाही.”

They should sit together and find a way out – Sanjay Raut

पुढे बोलताना ते ( Sanjay Raut ) म्हणाले, “आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून वाद होताना दिसत आहे. दुर्दैवानं हे सर्व आपल्याला बघावं लागत आहे.

मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांना एकत्र बसून या मुद्द्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. हे दोघे एकमेकांना आव्हान कसलं देत आहे? त्यांनी दिलेलं आव्हान महाराष्ट्राच्या मुळावर येत आहे.

त्यांनी दिलेलं आव्हान महाराष्ट्राच्या सामाजिक अखंडतेवर येत आहे. आव्हान न देता त्यांनी एकत्र बसून यावर मार्ग काढायला हवा. त्यांनी जर असं केलं तर त्यांच्या नावाच्या घोषणा दिल्या जातील.”

महत्वाच्या बातम्या