Maratha Reservation | वेळ पडल्यास भुजबळांची गाडी फोडू शकतो; स्वराज्य संघटनेचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha Reservation | पुणे: मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलेलं आहे. मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागणीवरून जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये ( Chhagan Bhujbal ) दिवसेंदिवस वाद वाढत चालला आहे.

याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शासकीय विश्रामगृहात छगन भुजबळ पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आले आहे.

यादरम्यान स्वराज्य संघटनेचे धनंजय जाधव देखील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे. छगन भुजबळ यांनी थोडं सबुरीने घ्याव. वेळ पडल्यास भुजबळांची गाडी फोडू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Chhagan Bhujbal will hold a meeting of office bearers

पुण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये आज छगन भुजबळ पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. या बैठकीपूर्वी स्वराज्य संघटनेचे धनंजय जाधव त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी भुजबळांना इशारा दिला. धनंजय जाधव यांनी त्यांची गाडी भुजबळांच्या गाडी शेजारी लावली. त्यानंतर त्यांनी दोन्ही गाड्यांमधील अंतर दाखवलं.

मग त्यांनी गाडी फोडायला वेळ लागणार नाही, असा इशारा  दिला. त्यांच्या या इशाऱ्यानंतर ओबीसी आणि मराठा समाजामधील ( Maratha Reservation ) वाद आणखीन पेटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र  ( Maratha Reservation ) द्या, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे.

त्यांच्या या मागणीला  ( Maratha Reservation ) ओबीसी समाजासह मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे.

यानंतर मनोज जरांगे राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी  ( Maratha Reservation )  सभा घेत आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांचे राज्यामध्ये जागोजागी एल्गार मेळावे पार पडत आहे.

या सभांमध्ये दोन्ही नेते एकमेकांवर खालच्या स्तराला जाऊन टीका करताना दिसली आहे. यानंतर मराठा  ( Maratha Reservation ) आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या