Share

Hardik Pandya | गुजरातच्या चिंतेत भर; हार्दिक पांड्या गुजरातला सोडून मुंबईत परतला

Gujarat Titans can be led by Shubman Gill

Published On: 

Hardik Pandya | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग 2024 ची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सर्व फ्रॅंचाईजींनी कायम आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

अशात आपल्याला अनेक संघांमध्ये बदल झालेले दिसत आहे. या सर्व घडामोडीनंतर गुजरातच्या ( Gujarat Titans ) चिंतेत वाढ झालेली दिसून आली आहे.

कारण गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) मुंबई इंडियन्समध्ये ( Mumbai Indians ) परतला आहे.

हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) मुंबईमध्ये सामील झाल्यानंतर गुजरातचा पुढचा कर्णधार कोण असेल? असा सवाल आता गुजरातसमोर उपस्थित झाला आहे.

Gujarat Titans can be led by Shubman Gill

हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. त्याच्या या घरवापसीनंतर गुजरातच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

कारण हार्दिकच्या ( Hardik Pandya ) नेतृत्वाखाली गुजरातने आयपीएलच्या दोन्ही हंगामामध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली होती.

पांड्यानंतर ( Hardik Pandya ) गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिल ( Shubman Gill ) करू शकतो, अशा चर्चा सुरू आहे. गिलने जर गुजरातचं नेतृत्व केलं तर भारतीय संघाच्या भविष्यातील कर्णधारांच्या रेसमध्ये देखील तो सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कारण रोहित शर्मानंतर ( Rohit Sharma ) एकदिवसीय संघाचा कर्णधार कोण असेल? याबाबत बीसीसीआय नक्कीच चाचपणी करत असेल. अशात शुभमन गिलने जर गुजरातचं नेतृत्व चांगलं केलं तर तो भविष्यामध्ये वनडे कर्णधार होऊ शकतो.

दरम्यान, हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या जर्सीत दिसणार आहे. यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि निवड समितीचे अध्यक्ष राहिलेले कृष्णमचारी श्रीकांत यांनी याबाबत तसे संकेत दिले आहे.

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलत असताना हार्दिक पांड्या( Hardik Pandya )  मुंबई इंडियन्स नेतृत्व करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर रोहित शर्मा मुंबईचं कर्णधार पद सोडणार असून हार्दिक पांड्या संघाचा धुरा सांभाळणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal | शिंदे समिती बरखास्त करा, आम्ही मराठ्यांची मागणी कधीच मान्य करणार नाही – छगन भुजबळ

Bank Job | SBI मध्ये नोकरीची संधी! 5447 रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Sanjay Raut | एकत्र बसून मार्ग काढा, एकमेकांना आव्हान देत बसू नका; संजय राऊतांनी भुजबळ-जरांगेंना झाप-झाप झापलं

Maratha Reservation | वेळ पडल्यास भुजबळांची गाडी फोडू शकतो; स्वराज्य संघटनेचा इशारा

Manoj Jarange | ओबीसी नेते जाणून-बुजून वातावरण दूषित करताय; जरांगेंचा भुजबळांना टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही