IPL 2024 | IPL लिलावासाठी तब्बल 1166 खेळाडूंची नोंदणी; 830 भारतीय खेळाडूंचा समावेश

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2024 ची तयारी सुरू झाली आहे. 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईमध्ये आयपीएल 2024 ( IPL 2024 ) चा लिलाव होणार आहे.

तत्पूर्वी 30 नोव्हेंबर पर्यंत खेळाडूंना नाव नोंदणी करण्याची संधी होती. आयपीएल 2024 ( IPL 2024 ) च्या लिलावासाठी तब्बल 1166 खेळाडूंची नावे नोंदवण्यात आली आहे. यामध्ये 830 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे, तर 336 परदेशी खेळाडू आहे.

18 players out of 830 are capped

आयपीएल 2024 ( IPL 2024 )  च्या लिलावासाठी 1166 खेळाडूंच्या नावांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 212 कॅप्ड, 909 अनकॅप्ड आणि 45 सहयोगी देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे.

तर या यादीमध्ये 830 भारतीय खेळाडू सामील झाले आहेत. 830 पैकी 18 खेळाडू कॅप्ड आहे. यामध्ये उमेश यादव, शार्दुल ठाकूर, संदीप वारियर, हनुमा विहारी, हर्षल पटेल, चेतन सकारिया, मनदिप सिंग, जयदेव उनाडकर, बरिंदर स्त्रान, शहाबाद नदीम, वरुण आरोन, केस भरत, सिद्धार्थ कौल, धवल कुलकर्णी, मनीष पांडे, शिवम मावी, धवल कुलकर्णी केदार जाधव, करुण नायर, या खेळाडूंचा समावेश आहे.

दरम्यान, आयपीएल ( IPL 2024 ) लिलावापूर्वी अनेक संघात मोठे बदल झाले आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे.

हार्दिक पांड्या मुंबईमध्ये परतल्यानंतर गुजरातचं नेतृत्व शुभमन गिलकडे ( Shubman Gill ) सोपवण्यात आलं आहे. तर हार्दिकच्या घरवापसीनंतर जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे.

कारण रोहित शर्मानंतर बूमराह संघाचा कर्णधार होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु, हार्दिकच्या घरवापसीनंतर तो संघाचा कर्णधार होणार असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या