Rohit Pawar | भाजपसोबत गेला म्हणून तुमची कार्यक्षमता कमी झाली; रोहित पवारांनी अजित पवारांचे कान टोचले

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कर्जतमध्ये मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलत असताना अजित पवार यांनी शरद पवार गटावर टीका केली आहे.

यावेळी बोलत असताना अजित पवारांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्यावर त्यांच्या युवा संघर्ष यात्रेवरून शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधून संघर्ष यात्रा काढत आहे. मात्र, हे संघर्ष कसले? त्यांनी आयुष्यात कधी संघर्ष केला नाही आणि आता हा संघर्ष कशाचा? असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

अजित पवार यांच्या या वक्तव्यावर रोहित पवारांनी ( Rohit Pawar ) प्रतिक्रिया दिली आहे. भाजपसोबत गेला म्हणून तुमची कार्यक्षमता कमी झाली, असं रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी म्हटलं आहे.

Maharashtra has seen your efficiency and passion – Rohit Pawar

ट्विट करत रोहित पवार ( Rohit Pawar ) म्हणाले, “आदरणीय अजित दादा, युवांच्या मागण्यांसाठी आम्ही सर्व युवा पुणे ते नागपूर असा 800 किमीचा पायी प्रवास करत असून नागरिकांशी संवाद साधत आम्ही आतापर्यंत 500 किमीचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.

आपल्या नजरेत आमचा हा संघर्ष लहान असला तरी ज्या मागण्यांसाठी आम्ही संघर्ष करत आहोत त्या मागण्या अत्यंत महत्वाच्या असून लाखो युवांच्या भविष्याशी निगडित आहेत आणि याच मागण्यांसाठी भविष्यात मोठ्या संघर्षाची देखील आमची तयारी आहे.”

पुढे ते ( Rohit Pawar ) म्हणतात, “युवांच्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन चाललेल्या #युवा_संघर्ष_यात्रेकडे राजकीय टीकेसाठी का होईना आपले लक्ष गेलेच आहे तर युवकांचे जे मुद्दे आम्ही घेऊन चाललो आहोत.

त्यांच्याकडेही थोडे लक्ष द्या. आपण माझ्यावर काहीही टीका करा, टीका मी पचवून घेईल परंतु युवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर अजिबात खपवून घेणार नाही.”

“तुमची कार्यक्षमता आणि तळमळ महाराष्ट्राने याआधीही पाहिली आहे, भाजपसोबत गेलात म्हणून ती कार्यक्षमता आणि तळमळ कमी झाली असल्याच्या चर्चा असल्या तरी युवांचे प्रश्न मार्गी लावून आपली खरी ताकद पुन्हा एकदा दाखवून द्या”, असही त्यांनी ( Rohit Pawar ) म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.