Manoj Jarange | आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि आम्ही ते मिळवणारच – मनोज जरांगे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी राज्यामध्ये आंदोलन उभारलं आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी ( Manoj Jarange ) केली आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे.

याच पार्श्वभूमीवर ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे. अशात या प्रकरणावर अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी प्रतिक्रिया दिली होती.

इतर आरक्षणाला धक्का लागू नये, असं अजित पवार यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि आम्ही ते मिळवणारच, असं मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी म्हटल आहे.

We want reservation from OBC – Manoj Jarange

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले, “आमचं आरक्षण ओबीसी आरक्षणामध्ये आहे. याबाबत आमच्या शासकीय नोंदी सापडल्या आहे.

आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि आम्ही ते मिळवणारच. यामुळे कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही.

कारण आमचा त्यांच्यातच समावेश होतो. आम्ही वेगळा प्रवर्ग मागत नाही. आम्हाला ओबीसीत आरक्षण पाहिजे. आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळालं तर वंजारी आणि धनगर आरक्षणाला धक्का लागणार नाही.”

दरम्यान, महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. मराठ्यांच्या या मागणीला ओबीसींनी विरोध दर्शवला आहे.

त्यानंतर दोन्ही समाज आमने-सामने आले आहे. या मुद्द्यावरून मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) एकमेकांवर खोचक शब्दात टीका करताना दिसले.

त्यांच्या या टीकेनंतर दोन्ही समाजांनी एकमेकांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. अशात राज्य शासन मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या