Chhagan Bhujbal । ‘दादागिरी केली तर दादागिरीनेच उत्तर देऊ’; मराठा आंदोलकांना छगन भुजबळांचा दम

Chhagan Bhujbal comment manoj jarange patil about beed lathicharge and devendra fadnavis answer

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chhagan Bhujbal । महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. त्याला मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी विरोध केला आहे.

यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आमने-सामने आले आहे.

या मुद्द्यावरून दोन्ही नेते राज्यामध्ये जागोजागी सभा घेत आहे. या सभांमध्ये बोलत असताना दोन्ही नेते एकमेकांवर खालच्या स्तराला जाऊन टीका करताना दिसले.

अशात या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी ( Manoj Jarange )  पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, छगन भुजबळांचा कार्यक्रमच करतो, असं मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी म्हटलं आहे. त्याला भुजबळांनी इंदापूरच्या सभेत उत्तर दिले आहे.

मी तलवारींची आणि धमक्यांची भाषा करत नाही

“मी काय तलवारींची भाषा केली आहे का? ती भाषा त्याने केली. २४ तारखेनंतर तुला दाखवतो, तुझा हिशेब करतो हे कोण बोललं? आमचा विरोध मराठ्यांना नाही. आमचा विरोध झुंडशाहीला आहे. दादागिरी केली तर दादागिरीनेच उत्तर देऊ. त्यानंतर आमच्यावर जबाबदारी टाकू नका असंही भुजबळ म्हणाले आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, मात्र आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये एवढीच मागणी आम्ही करतो आहोत. त्यात काय चुकीचं आहे? असाही प्रश्न छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी म्हटलं आहे.”

“शुक्रवारी विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिलं. त्यांनी उत्तरात काय म्हटलं आहे? जमाव हिंसक झाला आणि ७९ पोलीस जखमी झाले. त्यानंतर लाठीचार्ज झाला. ही बाजू तेव्हाच पुढे यायला हवी होती तसं झालं असतं तर त्याला ( Manoj Jarange Patil) एवढी सहानुभूती मिळाली नसती.” छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) म्हणाले, “मला हे समजत नाही की हे सगळे का समोर आणलं नाही? मी दोन महिन्यांपासून हे सांगत होतो की पोलिसांना मारहाण झाली आहे. तरीही कुणीही काहीही बोललं नाही. माझ्यावर टीका करताना तो ( Manoj Jarange ) काहीही बोलतो. तरीही मी उत्तर दिल्यानंतर सांगितलं जातं अशांतता पसरते आहे.

महत्वाच्या बातम्या