Gautam Gambhir – ‘रोहित शर्माला वाईट कर्णधार म्हणत असाल तर हे योग्य…’ गौतम गंभीरचे मोठं व्यक्तव्य

If You Call Rohit Sharma A Bad Captain...": Gautam Gambhir

Gautam Gambhir – रोहित शर्माने ( Rohit Sharma ) 2023 चा एकदिवसीय विश्वचषकात शानदार खेळ केला. परंतु भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

36 वर्षीय रोहित शर्माने विश्वचषकात स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दोन नंबरचा खेळाडू होता. त्याने सामन्यांमध्ये भारताच्या धावांची गती वाढवत ठेवली आणि 11 डावात 125.94 च्या स्ट्राइक रेटने 597 धावा केल्या.

याआधी टी-20 विश्वचषक स्पर्धा 2022 च्या उपांत्य फेरीमध्ये टीम इंडियाला पराभव स्वीकाराचा सामना करावा लागला होता.

तेव्हापासून रोहित शर्मा ( Rohit Sharma ) टी-20 क्रिकेटपासून लांब आहे. अशात रोहित शर्मा ( Rohit Sharma )  टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

त्याचबरोबर आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये रोहित शर्माला ( Rohit Sharma )  भारतीय संघाचा कर्णधार बनवणार असल्याचं देखील बोललं जात आहे.

रोहित फॉर्ममध्ये नसेल तर त्याला T20 विश्वचषकासाठी निवडले जाऊ नये

दरम्यान, गौतम गंभीरने ( Gautam Gambhir )  रोहित शर्माबद्दल मोठे व्यक्तव्य केले आहे. तो म्हणाला, रोहित जर फॉर्ममध्ये नसेल त्याला T20 विश्वचषकासाठी निवडले जाऊ नये. कर्णधारपद ही मोठी जबाबदारी असते.  जर रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये असेल तरच त्याने T20 विश्वचषकात नेतृत्व करावे.

पुढे बोलतांना गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) म्हणाला, आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत रोहित शर्माने चांगली कामगिरी केली. गंभीरने भारताचा कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले आणि म्हटले की एका खराब खेळासाठी संघ किंवा कर्णधाराला जबाबदार धरणे अयोग्य आहे.

‘एएनआय पॉडकास्ट विथ स्मिता प्रकाश’ दिलेल्या मुलाखतीत गंभीर म्हणाला की, वर्ल्ड कपमध्ये भारताचे वर्चस्व होते आणि फक्त एक खराब खेळ होता.

“कर्णधारपदात, रोहितने ( Rohit Sharma ) खूप चांगली कामगिरी केली आहे. पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणे सोपे नाही. विश्वचषकात भारत चॅम्पियन संघाप्रमाणे खेळला.

एका खराब खेळामुळे रोहित शर्मा किंवा ही संघ खराब संघ बनत नाही. दहा सामन्यात त्यांनी वर्चस्व गाजवले होते. फक्त एका खराब खेळामुळे जर तुम्ही रोहित शर्माला वाईट कर्णधार म्हणत असाल तर ते योग्य नाही,” गंभीर ( Gautam Gambhir ) म्हणाला.

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.