Sports Bikes : 31 डिसेंबर 2023 पर्यंत मिळवा स्पोर्ट्स बाइकवर ६० हजार रुपयांची सूट

Kawasaki, Harley-Davidson, Triumph, and Ducati are offering year-end discounts

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sports Bikes : भारतीय वाहन बाजारात स्पोर्ट्सबाइक्सचा वेगळा आणि मोठा ग्राहकवर्ग आहे. इथल्या तरुणांना स्पोर्टबाइक्सचं वेड आहे. जर तुम्ही नवीन स्पोर्ट्सबाइक घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हि बातमी फायदेशीर ठरू शकेल. इंडिया कावासाकीने 31 डिसेंबर 2023 पर्यंत निवडक मोटारसायकलींवर ६० हजार रुपयांची सूट दिली आहे.

इंडिया कावासाकी मोटरने आपल्या निवडक मोटारसायकलींवर वर्षअखेरीला ऑफरची घोषणा केली आहे, ज्यामुळे खरेदीदारांना स्पोर्ट्स बाइक घरी आणण्याची चांगली संधी मिळणार आहे.

इंडिया कावासाकी मोटरने ही ऑफर MY2023 मोटरसायकलवर ₹60,000 च्या कमाल सूटसह दिली आहे.  31 डिसेंबर 2023 पर्यंत किंवा स्टॉक असे पर्यंत तुम्हाला ही बाईक खरेदी करता येईल.

Get Rs 60k discount on Sports Bike till 31st December 2023

Kawasaki Vulcan S क्रूझरला ₹60,000 ची कमाल सूट मिळते, तर Kawasaki Ninja 400 ₹35,000 च्या सूटसह उपलब्ध आहे.

याशिवाय, Kawasaki Ninja 650 ला ₹30,000 चे डिस्काउंट व्हाउचर मिळते, तर Versys 650 ₹20,000 च्या डिस्काउंट व्हाउचर आहे.

वर्षअखेरीला इंडिया कावासाकी मोटरने चांगल्या ऑफर दिला आहेत. जेणेकरून तरुण वर्गाचे स्पोर्टबाइक्स घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. Kawasaki व्यतिरिक्त, Harley-Davidson, Triumph आणि Ducati यासह इतर प्रीमियम मोटरसायकल कंपनीने वर्षअखेरीस सूट देत आहेत. अंतिम किमती मिळवण्यासाठी तुमच्या जवळच्या किंवा पसंतीच्या डीलरशीपशी संपर्क साधावा.

संबंधित बातम्यांनुसार, Kawasaki ने भारतात ₹1.35 लाख (एक्स-शोरूम) किंमतीची अपडेट केलेली W175 मोटरसायकल लॉन्च केली आहे. कावासाकी W175 ही ब्रँडची देशातील सर्वात चांगली मोटरसायकल आहे आणि ती अलॉय व्हील आणि इतर सूक्ष्म अपडेट्ससह येते.

कावासाकी कंपनीने इंडिया बाईक वीक 2023 मध्ये नवीन निन्जा ZX-6R चे अनावरण देखील केले, जे पुढील वर्षी लवकर लॉन्च होण्यार आहे. बहुप्रतीक्षित नवीन कावासाकी एलिमिनेटर 450 भविष्यात भारतात येऊ शकेल.

महत्वाच्या बातम्या