Manoj Jarange Patil | माझा समाज तिथं वाट बघतोय आणि इथं मी कसला आराम करू? – मनोज जरांगे

Manoj Jarange Patil health update

Manoj Jarange Patil |  मराठा आंदोलनाचा चेहरा असलेल्या जरांगे पाटलांची (Manoj Jarange) तब्येत पुन्हा एकदा खालावली आहे. सोमवार दि. ११ रोजी बीडमध्ये धाराशिव येथे झालेल्या सभेत जरांगे पाटलांची तब्ब्येत खालावली.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या (Maratha Reservation) पुढच्या सभांना ते उपस्थित असतील की नाही यावर शंका दर्शवली जात असताना माध्यमांशी बोलताना “मी काही मागे हटणार नाही,” असं ते म्हणाले.

धाराशिव येथील सभेदरम्यान त्यांची तब्ब्येत ठीक नव्हती, त्यांना चक्कर येत होती तरीही मंचावर बसून त्यांनी सभेला संबोधले. लोकांनी त्यांच्यासाठी घोषणा दिल्या. डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे आराम करायला सांगितलेलं असताना देखील त्यांनी डिस्चार्ज घेतला. जरांगे पाटील आपल्या ध्येयाशी पूर्ण निष्ठेने वचनबद्ध आहेत असं त्यांचे सहकर्मी विजय तारक म्हणाले.

२४ तारखेला शंभर टक्के आरक्षण मिळणार?

मराठ्यांना हवे असलेले पूर्ण आरक्षण मिळण्याची चोवीस तारीख ठरलेली असूनही जरांगेंचा सरकारवर अविश्वास कायम आहे. “एका नेत्याचं ऐकून सरकार दबावाखाली येतंय त्यामुळे आरक्षण मिळण्याची तारीख सतत पुढे ढकलली जातेय की काय,” अशी शंका जरांगे पाटलांनी ( Manoj Jarange Patil ) व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, “आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरूच रहाणार, नुसता चोवीस तारखेपर्यंत नाही. चोवीसला मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण मिळेल, आणि नाही मिळालं तर आम्ही लढायला सज्ज आहोत. आम्ही मागे हटणार नाही. मराठा आता एक झालेला आहे.”

आंदोलनाची पुढची दिशा काय असेल याबाबत १७ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता अंतरवली बैठक असणार आहे हे त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाचे सारे स्वयंसेवक, आयोजक, मोठमोठे डॉक्टर, वकील, व्यावसायिक त्याचबरोबर साहित्यिक अभ्यासक आणि तज्ञ हे सारे त्या बैठकीला उपस्थित असतील, ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.