Rohit Sharma | रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढल्यानंतर अंबानी तसेच मुंबई इंडियन्सला बसलाय मोठा धक्का

Fans unhappy after Rohit Sharma replaced as Hardik Pandya Mumbai Indians captain for IPL 2024

Rohit Sharma | IPL  2024 | आयपीएल 2024 सुरु होण्यासाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्या गुजरातची टीम सोडून पुन्हा मुंबई इंडियन्सकडे आला होता.

हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये परत आल्यानंतर रोहित शर्मा कडून मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधार पद काढून घेतले आहे. आणि आता हार्दिक पांड्या  ( Hardik Pandya ) संघाचे नेतृत्व करणार आहे.

मुंबई इंडियन्सने प्रेस रिलीज पब्लिश करत मुंबई इंडिअन्सचा नवा कॅप्टन म्हणून हार्दिक पंड्याची घोषणा केली. या घोषणेनंतर मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माच्या फॅन्सला मोठा धक्का बसला आहे होता.

यावर मुंबई इंडियन्सचा ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स असलेल्या महेला जयवर्धने प्रतिक्रया दिली आहे, तो म्हणाला ‘”हा वारसा उभारणीचा एक भाग आहे. सचिनपासून ते हरभजनपर्यंत आणि रिकीपासून रोहितपर्यंत मुंबई इंडियन्सला नेहमीच एक चांगलं नेतृत्व लाभलं आहे. भविष्याचा विचार करता आयपीएल 2024 साठी हार्दिक पंड्यावर मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.’

रोहित शर्माचे कौतुक करत म्हणाला’ रोहित शर्माने आतापर्यंत टीमसाठी जे योगदान दिल आहे त्याच्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो; 2013 पासूनचा मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याचा कार्यकाळ हा खूपच उत्कृष्ट होता. त्याच्या नेतृत्वाने संघाला केवळ अतुलनीय यश मिळवून दिले नाही तर त्याने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणून आपले स्थान पक्के केले आहे”.

Fans unhappy after Rohit Sharma replaced as Hardik Pandya Mumbai Indians captain for IPL 2024

पण या निर्णयांवर मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माच्या फॅन्स चिडले आहे. त्यांनी मुंबई इंडियन्सला सोशल मीडिया तसेच अन्य ठिकाणी अनफोल्लो करायला सुरवात केली आहे.

वयाचे कारण देऊ नका, महेंद्र सिंग धोनीचे वय रोहित शर्मा पेक्षा जास्त आहे तरीही तो चेन्नईचा यशस्वी कर्णधार आहे. असे म्हणत रोहित शर्माचे फॅन्स मुंबई इंडियन्सला अनफोल्लो करत आहे.

आता रोहित शर्मा नाही तर मुंबई इंडियन्सला आमचा सपोर्ट नसल्याचे फॅन्सने सांगितले आहे. हार्दिक पंड्याला कर्णधार केल्याने मुंबई इंडियन्सच्या फॅन्स आवडलेले दिसत नाही आहे. याचा फटका मुंबई इंडियन्सला नक्की बसणार आहे. त्यांचे चाहते आता कमी होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.