Rohit Sharma | रोहितने दिला कर्णधारपदाचा राजीनामा; वाचा पूर्ण बातमी

Rohit Sharma resigns from the captaincy of mumbai indians

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma | IPL  2024 | रोहित शर्माने ( Rohit Sharma ) 2023 चा एकदिवसीय विश्वचषकात शानदार खेळ केला. परंतु भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

36 वर्षीय रोहित शर्माने विश्वचषकात स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दोन नंबरचा खेळाडू होता. त्याने 11 डावात 125.94 च्या स्ट्राइक रेटने 597 धावा केल्या.

भारताचा कर्णधार राहिलेला रोहित शर्मा  (Rohit Sharma) क्रिकेट फिल्ड शांत स्वभावासाठी, तल्लख बुद्धीसाठी आणि योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेसाठी आपल्या चाहत्यांमध्ये ओळखला जातो. 

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सुद्धा तो आपल्या कौशल्यांचा वापर करून एका उत्कृष्ट खेळाची मेजवानी आपल्या चाहात्यांना देतो. 2011 पासून रोहित मुंबई इंडियन्स संघासाठी खेळतो आहे. तो मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) बॅटिंग लाईनअपचा एक महत्त्वाचा भाग आहे. तसेच 2013 पासून तो संघाचा कर्णधार आहे. 

हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. त्याच्या या घरवापसीनंतर गुजरातच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. कारण हार्दिकच्या ( Hardik Pandya ) नेतृत्वाखाली गुजरातने आयपीएलच्या दोन्ही हंगामामध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली होती. पांड्यानंतर ( Hardik Pandya ) गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिल ( Shubman Gill ) करू शकतो, अशा चर्चा सुरू आहे.

दरम्यान, हार्दिक पांड्याच्या घरवापसीनंतर रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधार पद सोडले असून हार्दिक पांड्या  ( Hardik Pandya ) संघाचे नेतृत्व करणार आहे.

Don’t Take Rohit Sharma For T20 World Cup – Gautam Gambhir

दरम्यान, गौतम गंभीरने ( Gautam Gambhir )  रोहित शर्माबद्दल स्फोटक व्यक्तव्य केले आहे. तो म्हणाला, रोहित जर फॉर्ममध्ये नसेल त्याला T20 विश्वचषकासाठी निवडले जाऊ नये. कर्णधारपद ही मोठी जबाबदारी असते.  जर रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये असेल तरच त्याने T20 विश्वचषकात नेतृत्व करावे.

महत्वाच्या बातम्या