Devendra Fadnavis । मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनी केला – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis comment on maratha reservation and sharad pawar

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Devendra Fadnavis । मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार (sharad Pawar) यांनी केला असल्याचं मोठं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं.

शरद पवारांना मराठा समाजाला कधी आरक्षण द्यायचेचं नव्हते. स्वत:च्या नेतेपदासाठी शरद पवारांनी समाजांना झुंझवत ठेवल्याचे फडणवीस म्हणाले.

Sharad Pawar Against On Maratha Reservation – Devendra Fadnavis

पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केल्याचे देवेंद्र फडणवीस  ( Devendra Fadnavis ) म्हणाले. शरद पवार यांच्या मनात असतं तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते असे फडणवीस म्हणाले. त्यांना कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हतं. त्यांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचे होते असे म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली.

महाराष्ट्रात ज्यावेळी आपलं सरकर होतं त्यावेळी आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ते सर्वोच्च न्यायालयात आपल्या सरकारच्या काळत टिकले होतं. आत्तासुद्दा आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र, हे आरक्षण देताना ओबीसींवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. काहीही झालं तरी चालेल असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या आरक्षणावर संकट येणार नाही हे भाजपचं आश्वासन असल्याचे फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या