IND Vs SA | Suryakumar Yadav | दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात झालेल्या दुखापतीवर सूर्या म्हणाला, दुखापत गंभीर … !

Suryakumar Yadav gives update on ankle injury scare

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND Vs SA | Suryakumar Yadav | दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये दुखापत झाल्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav ) उचलून मैदानाबाहेर नेल्यामुळे दुखापत गंभीर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र मी बरा असून मला व्यवस्थित चालता येत आहे. ही दुखापत फारशी गंभीर नाही, असे सूर्याने सामना संपल्यानंतर स्पष्ट केले आहे.

आफ्रिकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेमध्ये पहिला सामना पावसाने रद्द झाला, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ५ विकेटने विजय मिळवून 1-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र तिसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधार सूर्याने ( Suryakumar Yadav ) दमदार शतकी खेळी करून भारताला तिसरा T20i  ( IND Vs SA ) सामना जिंकवला.

Man Of The Match And Man Of The Series Award To Suryakumar Yadav

भारताने दक्षिण आफ्रिकेपुढे ( IND Vs SA ) विजयासाठी 200 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर कुलदीप यादवच्या भेदक माऱ्यामुळे आफ्रिकेचा डाव 95 धावांवर आटोपला. कुलदीप यादवने ५ विकेट घेत महत्वाची कामगिरी बजावली.

मालिकावीर आणि सामनावीर दोन्ही पुरस्कारावर सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav ) नाव कोरले.

Suryakumar Yadav shares Ankle injury update

तिसरा T20i सामन्यासाठी क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सूर्याच्या घोटय़ाला दुखापत झाली होती. त्याला खांद्यावर उचलून मैदानाच्या बाहेर नेण्यात आले.

कर्णधार सूर्यकुमार यादवच्या दुखापतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती, मात्र सामना संपल्यानंतर सूर्यानेच ही दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले. सूर्या ( Suryakumar Yadav ) म्हणाला, मी पूर्णपणे बरा आहे. सामन्यामध्ये शतक करणं आणि त्या सामन्यात विजय मिळणं हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.

महत्वाच्या बातम्या