Devendra Fadnavis | ठाण्यात भाजपच्या नेत्याने मुलीला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला; गुन्हेगाराला फडणवीसांचे अभय? अटक नाही

BJP leader tries to crush girl under car; Devendra Fadnavis' protection to the criminal? Ashwajit Gaikwad

Devendra Fadnavis | नागपूर, दि. १६ डिसेंबर । ठाण्यात एका मुलीच्या अंगावर गाडी घालून तीला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी गुन्हेगाराला मात्र अजून अटक करण्यात आलेली आहे. यात काहीतरी गौडबंगाल असून संशयाला बळ देणारे आहे.

देवेंद्र फडणवीस हे अतिशय कार्यक्षम व सक्षम नेते आहेत असे सांगितले जाते मग एवढे कार्यक्षम नेते गृहमंत्री पदावर असतानाही ठाण्यासारख्या शहरात मुलीला चिरडण्याचा गंभीर प्रकार होत असेल तर त्यांच्या कार्यपद्धतीवर व कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. गृहविभाग काय करत आहे ? आणि ठाणे प्रकरणातील गुन्हेगाराला अटक कधी होणार? याचे उत्तर महाराष्ट्राला द्या, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

ठाण्यातील घटनेवर प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, भाजपाने एक नवीन प्रशासकीय पॅटर्न आणला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुन्हा पुन्हा महत्वाच्या पदावर नियुक्त्या दिला जात आहेत यातून या अधिकाऱ्यांची मुलेही निर्ढावत असल्याचे दिसत आहे. ठाण्यात एका मुलीला गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न झाला त्यातील आरोपीचे नाव अश्वजित गायकवाड असून भारतीय जनता युवा मोर्चाचा तो नेता आहे तसेच MSRDC चे वरिष्ठ अधिकारी अनिल गायकवाड यांचा तो मुलगा आहे. त्या मुलीशी अश्वजितचे प्रेमसंबंध होते अशी माहिती मिळत आहे. वडिल प्रशासनात उच्च अधिकारी असल्यानेच अश्विजित गायकवाडला अटक होत नाही का असा प्रश्न लोंढे यांनी विचारला आहे.

भाजपाशी संबंधित लोकांमध्ये महिला अत्याचार तसेच बलात्कारांसारख्ये गंभीर गुन्हे करण्याची हिम्मत येते कोठून? आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत, असे भाजपाच्या लोकांना वाटत आहे का? कायदा आपले काही बिघडवू शकत नाही? ‘भाजपा है तो सब मुमकीन है’. अशी भावना त्यांच्यात वाढीस लागल्याचे दिसत आहे. मग ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ चे नारे कशाला देता? महिला सुरक्षेचा ढोल कशाला पिटता ? ठाणे प्रकरणातील गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला बेड्या ठोका व पीडित मुलीला न्याय द्या, असे अतुल लोंढे म्हणाले.

त्याने माझ्या अंगावर गाडी घातली, प्रियाने रडत रडत सांगितली घटना

गेल्या रविवारी घोडबंदर रोडजवळ एका मित्राच्या संगीत फंक्शनमध्ये आल्याचे अश्वजितने प्रियाला सांगितले होते. सोमवारी पहाटे 4.30 च्या सुमारास प्रिया तेथील हॉटेलजवळ पोहोचली. तिथे अश्वजीत त्याच्या पत्नीसोबत होता. प्रियाला अचानक बघून अश्वजीतला धक्का बसला. त्यानंतर सर्व घटना घडली, असे प्रियाने सांगितले.

अश्वजित गायकवाड याने ओळवा येथील कोटियाड हॉटेल जवळ भेटायला बोलावले होते. त्या ठिकाणी त्याने शिवीगाळ करून जबर मारहाण केली. डाव्या हाताला चावा घेत, तिच्या अंगावर कार घातली, असा आरोप प्रियाने केला.

कोण आहे प्रिया सिंह ( Ashwajit Gaikwad Vs Priya Singh )

मुंबईत राहणारी प्रिया सिंह ही  मॉडेल, फिटनेस ट्रेनर, फॅशन प्रमोटर असून इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर आहे. तिचे इस्टाग्रामवर १.१ मिलियन फॉलोअर्स आहेत.  घोडबंदर येथील वाघबीळ भागात ती राहते. तिचे अश्वजितशी प्रेमसंबंध असल्याचे म्हटले जात आहे. परंतु अश्वजित याचे लग्न झाले आहे. त्याने ते आपल्यापासून लपवून ठेवल्याचा प्रियाचा आरोप आहे. माझा घटस्फोट झाला असून तुझ्याशी मी लग्न करणार असल्याचे तो सांगत असल्याचे प्रियाकडून सांगण्यात आले.

काय म्हणाला अश्वजित गायकवाड ( Ashwajit Gaikwad Vs Priya Singh )

अश्वजित याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, प्रिया सिंह माझी केवळ मित्र होती. मी परिवाराच्या कार्यक्रमामुळे हॉटेलमध्ये आला होतो. त्या ठिकाणी प्रिया पोहचली. तिने जबरदस्तीने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने मद्यपान केले असल्यामुळे मी नकार दिला. त्यानंतर ती गोंधळ घालू लागली. शिवीगाळ करु लागली. माझ्या मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने मारहाण सुरु केली. त्याचवेळी चालकाने गाडी सुरु केली. त्यावेळी प्रिया रस्त्यावर पडली. हा एक अपघात होता. प्रियाचा माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप अश्वजितने केला.

कोण आहे अश्वजित गायकवाड ( Ashwajit Gaikwad Vs Priya Singh )

MSRDC चे वरिष्ठ अधिकारी अनिल गायकवाड यांचा तो मुलगा आहे. तसेच तो भारतीय जनता युवा मोर्चाचा नेता आहे.

Ashwajit Gaikwad No Arrest Yet

या घटनेने समाजात खळबळ उडाली असतानाच महाराष्ट्र पोलिसांनी आत्तापर्यंत, कोणालाही अटक केलेली नाही, अनेकांनी अश्वजितला हल्ल्यासाठी जबाबदार धरण्यात विलंब झाल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अश्वजित गायकवाडला अभय देत असल्याच्या चर्चा आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.