Airtel | परदेशात फिरायला जाताय? मग Airtel चे ‘हे’ रिचार्ज प्लॅन्स एकदा वापरून पाहाच

Airtel International Roaming Plans

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Airtel  | तेजस भागवत | भारती एअरटेल देशातील दुसऱ्या क्रमांकांची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जीओनंतर एअरटेल कंपनीने आपले ५ जी नेटवर्क सुरु केले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये ५ जी नेटवर्कची सुविधा ग्राहकांना मिळत आहे. तसेच एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी विविध रिचार्ज प्लॅन सतत लॉन्च करत असते. जेणेकरून करून ग्राहकांना इंटरनेट वापरताना अधिक आनंद मिळू शकेल. आता २०२३ हे वर्ष लवकरच संपणार आहे. त्यानिमित्ताने तुम्ही जर का परदेशात फिरायला जाणार असाल तर एअरटेल तुमच्यासाठी प्रीपेड आणि पोस्टपेड रोमिंग प्लॅन्स देखील ऑफर करते. १८० पेक्षा अधिक देशांमध्ये तुम्ही हे प्लॅन्स वापरू शकता. तर या प्लॅन्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

एअरटेलचा ( Airtel ) ८९९ रुपयांचा आंतरराष्ट्रीय प्लॅन

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला १० दिवसांची वैधता मिळते. हा प्लॅन दोन सेट मध्ये येतो. पहिला सेट हा ११० पेक्षा अधिक तर दुसरा सेट हा ६० पेक्षा अधिक देशांमध्ये वापरता येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला १०० मिनिटांचे मोफत लोकल कॉल्सची सुविधा मिळते. पहिल्या सेटमध्ये आऊटगोइंग कॉल, इनकमिंग कॉल आणि भारतात कॉल करणे, १ जीबी डेटा तर दुसऱ्या सेटमध्ये लोकल आऊटगोइंग कॉल, इनकमिंग व भारतात कॉल, ५०० एमबी डेटा आणि १० एसएमएस करण्याची सुविधा मिळते. तसेच वापरकर्त्यांकडे व्हॉइस डेटा ऑन पॅक देखील मिळतो.

एअरटेलचा ( Airtel ) २,९९९ रूपयांचा आंतरराष्ट्रीय प्लॅन

एअरटेलच्या २,९९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला १० दिवसांची वैधता मिळते. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १०० मिनिटे मोफत लोकल आऊटगोइंग कॉल्स , इनकमिंग आणि भारतात कॉल, ५ जीबी हाय स्पीड डेटा देखील मिळतो. पहिल्या सेटमध्ये असणाऱ्या देशांमध्ये तुम्हाला २० मोफत एसएमएस करण्याचा फायदा देखील मिळतो. यामध्ये अमेरिका,युरोप, आशिया आणि अन्य ११० पेक्षा अधिक देशांचा समावेश आहे. दुसऱ्या सेटमध्ये वापरकर्त्यांना १० एसएमएस करण्यास मिळतात. ज्यामध्ये आफ्रिका, मालदीव आणि कॅरेबियन द्वीप समूहाचा समावेश आहे. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

महत्वाच्या बातम्या