Rupali Chakankar: महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी चक्क १९ जणांवर पुण्यात गुन्हा दाखल केला. यात सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांची नावे आहेत. सोशल मीडियावर बदनामी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
रुपाली चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का?
या कारवाईनंतर रुपाली ठोंबरे पाटील चांगल्याच संतापल्या आहेत. “आमच्या पोस्टमध्ये अश्लीलता कुठे आहे? पोलिसांना कायदा कळतो की नाही?” असा थेट सवाल त्यांनी विचारला. एवढे दिवस चाकणकर झोपल्या होत्या का, असा टोलाही त्यांनी लगावला.
आपण कायदेशीर लढा देणार असल्याचं ठोंबरे यांनी स्पष्ट केलं. नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणात पोलिसांनी एवढ्याच वेगाने कारवाई का केली नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अशा गुन्ह्यांना आपण भीक घालत नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
दुसरीकडे, अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी तर चाकणकरांवर थेट ५०० कोटींचा दावा ठोकला आहे. चाकणकर आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटात चाकणकरांचं कोणतंही पात्र नाही. तरीही ओटीटी प्लॅटफॉर्मवर दबाव आणून त्या चित्रपट रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचं सय्यद म्हणाल्या.
काहीही झालं तरी २ ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित होणारच, असा ठाम विश्वास सय्यद यांनी व्यक्त केला. या चित्रपटाचा आधार श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक आहे, ही कोणाचीही बायोग्राफी नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
नाशिकच्या ईशान्येश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष अशोक खरात यांना मार्च २०२६ मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाली. त्यांच्यासोबतचे जुने फोटो आणि व्हिडिओ वापरून सोशल मीडियावर बदनामी सुरू असल्याची चाकणकरांची तक्रार आहे. यातूनच हा सगळा कायदेशीर आणि राजकीय वाद पेटला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- बाहेर जेवायला जाताय? तुकाराम मुंढेंनी सांगितलेल्या ‘या’ ४ गोष्टी नक्की तपासा
- पिंपरी-चिंचवडमधील २ महिला पोलिसांचा समलैंगिक विवाह, अखेर लग्नाच्या तोंडावर मोठा निर्णय!
- तिरंगा गाऊनवरून देशात खळबळ, राष्ट्रध्वजाच्या अपमानाच्या आरोपांवर उर्वशी रौतेलाचं थेट उत्तर
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









