IPL 2024 Auction । ज्याने भारताचे २०२३ विश्वचषकाचे स्वप्न मोडले; त्यावरच आयपीएल 2024 मध्ये मोठी बोली लागणार?

IPL 2024 Auction Travis Head Ricky Ponting Ravichandran Ashwin

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 Auction: आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबरला दुबई येथे पार पडणार आहे. या लिलावासाठी 333 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आली आहे. दहा संघात एकूण 77 जागा रिक्त आहेत. त्यामुळे यापैकी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार आणि कोणाला डच्चू मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

IPL 2024 Auction Ricky Ponting to Travis Head 

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ट्रेव्हिस हेड साठी दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रेंचायसी कडून मोठी बोली लावण्यात येण्यात येणार आहे. अष्टपैलू ट्रेव्हिस हेड संघात घेणाच्या बातमीला दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पॉटिंग याने दुजोरा दिला आहे.

ट्रेव्हिस हेडने आयपीएल 2016-2017 मध्ये आरसीबीसाठी एकूण 10 सामने खेळले. यात त्याने फक्त 205 धावा केल्या होत्या. त्यानंतर आरसीबीने त्याला रिलीज केलं. आता हेडचा फॉर्म पाहता आरसीबी देखील त्याला संघात घेण्यासाठी बोली लावू शकते.

IPL 2024 Auction Ravichandran Ashwin to Travis Head

दरम्यान अश्विनने ​​ट्रॅव्हिस हेडबाबत मोठे विधान केले आहे. तो म्हणाला, विश्वचषकाचा हिरो ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडला ४ कोटींपेक्षा जास्त किंमत मिळणार नाही. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवला ४ ते ७ कोटी रुपयांना विकत घेतले जाऊ शकते. यावेळी आयपीएलचा मिनी लिलाव 19 डिसेंबरला दुबई येथे पार पडणार आहे.  पहिल्यांदाच हा लिलाव भारताबाहेर होणार आहे. दुबईत होणाऱ्या लिलावात ३३३ खेळाडूंचे भवितव्य ठरणार आहे. एकूण ७७ जागा रिक्त आहेत. त्यापैकी ३० स्लॉट विदेशी खेळाडूंचे आहेत.

Travis Head scored a century in the final match between India vs Australia

भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) फायनल सामन्यात ट्रॅव्हिस हेडने दमदार शतक ठोकलं होते.  इतिहासात फायनलमध्ये (WTC Final 2023) एकाही खेळाडूला शतक ठोकता आलं नव्हतं. मात्र, ट्रॅव्हिस हेडने फायनलमध्ये शतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या स्फोटक सलामीवीराने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झटपट अर्धशतक झळकावले आणि 2 बळीही घेतले. त्याचवेळी, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात या खेळाडूने भारताविरुद्ध 137 धावांची इनिंग खेळून संघाचा विजय निश्चित केला होता आणि ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा वनडे विश्वचषक चॅम्पियन बनवले होते.

Delhi Capitals IPL Squad And Full List Of Players IPL 2024

दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंत, प्रवीण दुबे, डेव्हिड वॉर्नर, विकी ओस्वाल, पृथ्वी शॉ, एनरिक नोकिया, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, लुंगी एनगिडी, ललित यादव, खलील अहमद, मिशेल मार्श, इशांत शर्मा, इशांत शर्मा , मुकेश कुमार या खेळाडूंना कायम ठेवलं आहे.

IPL 2024 Auction | ट्रेव्हिस हेडसाठी मोठी बोली लागणार? दिग्गज खेळाडूंनी केले मोठे भाकीत

महत्वाच्या बातम्या