MS Dhoni | मोठी बातमी – चेन्नई संघाच्या मालकाने सांगितले महेंद्रसिंग धोनी कधी निवृत्त होणार…

MS Dhoni Retirement News

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MS Dhoni | इंडियन प्रीमियर लीगला सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तत्पूर्वी इंडियन प्रीमियर लीग भारतात होणार कि विदेशात याबाबत स्पष्टता आलेली नाही. कारण फेब्रुवारी २०२४ पासून आचारसंहिता आणि लोकसभेच्या निवडणुकांना सुरवात होईल असे बोलले जात आहे.

बीसीसीआयने क्रिकेटमधून 7 नंबर जर्सी निवृत्त केल्याने महेंद्रसिंग धोनी चर्चेत आला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलर नंतर हा सन्मान मिळणारा महेंद्रसिंग धोनी हा दुसरा खेळाडू ठरला होता.

इंडियन प्रीमियर लीगच्या अनेक सत्रांपासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा केली जात आहे. नुकत्याच दुबईत झालेल्या मिनी लिलावानंतर महेंद्रसिंग धोनी या हंगामानंतर निवृत्ती जाहीर करणार का, असा प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ लागला आहे.

चेन्नई सुपर किंग्स इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. आतापर्यंत या संघाने सर्वाधिक ५ वेळा ट्रॉफीवर नाव कोरले आहे. हे सर्व विजय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली मिळाले आहेत. 2020 मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर प्रत्येक वेळी धोनी आयपीएल खेळायला आला की त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगतात.

MS Dhoni retires from IPL ?

चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी धोनीच्या आयपीएलमधून निवृत्तीवर आपले मत मांडले आहे. टाईम्स नाऊशी बोलताना ते म्हणाले की, महेंद्रसिंग धोनी त्याच्या कारकिर्दीबाबत जो काही निर्णय घेईल तो तो स्वतः घेईल. त्यांचे भविष्य तो स्वतः ठरवेल. आमच्यापैकी कुणालाही याबाबत माहिती नाही त्यामुळे आम्ही याबाबत काहीही बोलू शकत नाही.

काशी विश्वनाथ पुढे म्हणाले की, धोनीने या सीझननंतर खेळणार की नाही याबाबत अद्याप आम्हाला काहीही सांगितले नाही. चेन्नई संघाच्या कर्णधाराने याबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत. अशा परिस्थितीत जो काही निर्णय घेतला जाईल तो धोनी स्वत: घेईल.

हे वाचा – सामन्यांच्या तारखा, ठिकाण, संघांची यादी, कर्णधार, संघ मालक आणि वेळ, आयपीएलबाबत सर्व माहिती

महत्वाच्या बातम्या