Chitra wagh | पाटलांच्या इशा-यावरून बावळटबाई, नाचxxx; घुंगरू वाजवू नका…तमाशा चालणार नाही – चित्रा वाघ

Chitra wagh | मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद ( Urfi Javed) हिच्यावरून चित्रा वाघ यांनी महिला आयोगाकडे प्रश्न उपस्थित करत रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar) यांना लक्ष केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा ट्विट करत चित्रा वाघ यांनी अप्रक्षरीत्या महिला आयोग अध्यक्ष चाकणकर यांना डीवचल आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ (  Chitra Wagh comment On Rupali Chakankar )

ट्विट करत चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे की, काहींना गजनीसारखा शॉर्ट टर्म मेमरी लॅास झालाय..! या ताई महाविकास आघाडीचा तीन पैशांचा तमाशा खूप लवकर विसरल्या आहेत. तसचं आता महिला आयोगाने काय- काय काम केलं याची आठवण करून देत आहेत. पण जेव्हा अनिल देशमुख, नवाब मलिक या काळू बाळूंनी पैशाची उधळण केली होती. त्यावेळी मात्र त्या गप्प होत्या . महिला अत्याचाराविरोधात कारवाई करण्याऐवजी तुम्ही काय हातात तुणतुणं घेतलं होतं? तेंव्हा मात्र या बावळटबाई आश्वासनाचा पोकळ बार उडवत होत्या.. ते ही गणपत पाटलांच्या इशा-यावरून…आणि तुम्ही ‘कोणाच्या तालावर, कोणाच्या बोलावर’ नाचताय हे सर्वांना माहीत आहे. म्हणूनच तुमच्या सारख्या दरोडेखोरांचा तमाशा राज्यातील जनतेनं बंद पाडला आहे… पुन्हा घुंगरू वाजवू नका… इथे तमाशा चालणार नाही. पडदा पडला ! अशा शब्दात चित्रा वाघ यांनी रूपालीताई चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

गणपत पाटलांच्या इशा-यावरून…आणि तुम्ही ‘कोणाच्या तालावर -बोलावर’ नाचताय

गणपत पाटील यांच्या इशाऱ्यावर आयोग काम करत असल्याचे म्हंटले आहे , नेमके गणपत पाटील कोण याचा शोध नेटकरी घेत आहेत. तसेच ट्विट मध्ये त्यांनी अनिल देशमुख, नवाब मलिक यांचा काळू-बाळू म्हणून उल्लेख केला आहे. काळू बाळूंनी पैशाची उधळण केली होती. त्यावेळी मात्र त्या गप्प होत्या असेही म्हंटलं आहे.

दरम्यान, सुरुवातीला चित्रा वाघ या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा होत्या त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर रूपाली चाकणकर यांच्याकडे पुणे शहर महिला राष्ट्रवादीचं अध्यक्षपद होतं. त्याकाळात चाकणकर आणि चित्रा वाघ यांची चांगली मैत्री देखील सर्वांनी बघितली आहे. परंतु आता मात्र एकमेकींच्या कट्टर विरोधक पाहायला मिळत आहेत. तसचं उर्फी जावेदच्या शॉर्ट कपड्यावरून देखील चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाला प्रश्न विचारले होते. तसचं महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं. त्यानंतर रूपाली चाकणकर यांनी उर्फी जावेदच्या बाजूने भूमिका घेत महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांना नोटीस बजावली होती. या प्रकरणावरून दोघींमधील वाद चांगलाच पेटलेला पाहायला मिळाला होता.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.