Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा! समोर आली महत्त्वाची माहिती

Maharashtra Political Crisis | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. त्याचबरोबर सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

एकूण 19 मंत्री शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यातील मंत्रिमंडळात सध्या 20 मंत्री आहेत. त्यापैकी बहुतांश मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्याचा कारभार सोपवला आहे. त्याचबरोबर एका मंत्र्याकडे अनेक खाती आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. विधानसभा अध्यक्षांकडे हा निर्णय गेल्यामुळे शिंदे सरकार बचावलं आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराचा रखडलेला मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष देण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button