Chitra Wagh | कावळा कोण आणि कोकिळा कोण? हे सिद्ध झालं; कोर्टाच्या निकालानंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

Chitra Wagh | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला दिलासा मिळालेला असून ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

सत्ता संघर्षाच्या निर्णयानंतर ट्विट करत चित्रा वाघ म्हणाल्या, “कावळा कोण आणि कोकिळा कोण हे सुप्रीम कोर्टाच्या निकालातून सिद्ध झालं आहे. कावळा काव काव करत राहिला आणि कोकिळेला न्याय मिळाला. हा लोकशाहीचा विजय आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार कायम राहणार.”

एवढेच नाही तर पंतप्रधान मोदीजींचा फोटो लावून तुमचे आमदार निवडून आले होते. त्यानंतर तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. उद्धव ठाकरेंनी मतदारांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका देखील चित्रा वाघ यांनी केली आहे.

दरम्यान, सत्ता संघर्षाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रतिक्रिया दिली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारवर पदाचा राजीनामा द्यावा असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर उत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारमध्ये निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन सरकार स्थापन केलं. तेव्हा तुमची नैतिकता कुठं होती? उद्धव ठाकरे यांना नैतिकतेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.”

महत्वाच्या बातम्या